व्यंजन संधी | Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

व्यंजन संधी | Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi

Vyanjan Sandhi Marathi

व्यंजन संधी व त्याचे नियम

Vyanjan Sandhi in Marathi

Vyanjan Sandhi v Tyache Niyam

व्यंजन संधी व त्याचे नियम ( Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi Vyanjan Sandhi v Tyache Niyam )

व्यंजन संधी व त्याचे नियम ( Vyanjan Sandhi Marathi  | Vyanjan Sandhi in Marathi | Vyanjan Sandhi v Tyache Niyam )  :- 

            व्यंजन संधी व त्याचे नियम ( Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi Vyanjan Sandhi v Tyache Niyam ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी व्यंजन संधी ( Marathi Vyanjan Sandhi | Vyanjan Sandhi in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी व्यंजन संधी मराठी ( Vyanjan Sandhi in Marathi | Vyanjan Sandhiche Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया व्यंजन संधी व त्याचे नियम | Vyanjan Sandhi v Tyache Niyam | Vyanjan Sandhi in Marathi | Vyanjan Sandhi Marathi ).

        व्यंजन संधी ( Vyanjan Sandhi ) बघण्यागोदर आपल्याला संधी म्हणजे काय ते माहित असणे गरजेचे आहे. आपण बोलत असताना आपल्याला नवनवीन शब्दांची ओळख होत असते. बऱ्याच वेळी काही शब्द असतात जे दोन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेले असतात परंतु आपण त्यांचा उच्चार एकत्र करत असतो.

उदाहरणार्थ :-
'गुरूपदेश' हा शब्द गुरू + उपदेश या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तसेच

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन

            वरील प्रमाणे जे जोडशब्द तयार होतात त्यांनाच संधी असे म्हणतात.

संधी म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' ( Sandhi ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


        तसेच जेव्हा जोडशब्दांना आपण वेगळे करत असतो त्याला आपण त्या जोडशब्दाचा विग्रह म्हणजेच संधीचा विग्रह करणे असे म्हणतो.


संधीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

     स्वरसंधी [ Swar Sandhi ]

     व्यंजनसंधी [ Vyanjan Sandhi ]

     विसर्गसंधी [ Visarg Sandhi ]

            चला तर मग आता 'व्यंजन संधी' ( Vyanjan Sandhi ) म्हणजे काय ?

व्यंजन संधी म्हणजे काय ?

➤ दोन शब्दाची संधी होताना जेव्हा जवळ जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन असेल व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा ती 'व्यंजन संधी' ( Vyanjan Sandhi ) असते.


[ व्यंजन संधी = व्यंजन + व्यंजन / स्वर ]

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहस्वर / व्यंजनसंधी
विपद् + कालद् + क् = तविपत्काल
वाग् + पतिग् + प् = कवाक्पति
अच् + अंतच् + अं = जअजंत
वट् + आननट् + आ = डवडानन
सत् + इच्छात् + इ = दसदिच्छा
जगत् + नाथत् + न् = न्जगन्नाथ
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


वर्ण वर्ग तक्ता

वर्ण वर्ग

'क' वर्ग

'च' वर्ग

'ट' वर्ग

'त' वर्ग

'प' वर्ग

म्

 १ व २ हे कठोर वर्ण आहेत.

 ३ व ४ हे मृदू वर्ण आहेत.

 ५ हे अनुनासिके आहेत.



हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार


व्यंजन संधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

नियम १] पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. त्याला 'प्रथम व्यंजन संधी' ( Pratham Vyanjan Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहबद्दल पहिले वर्णसंधी
आपद् + कालद् = तआपत्काल
षड् + शास्त्रड = टषट्शास्त्र
वाग् + पतिग् = कवाक्पति
क्षुध् + पिपासा = तक्षुत्पिपासा

 


नियम २] पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय स्वर किंवा मृदू व्यंजन आले असल्यास त्याच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. त्याला 'तृतीय व्यंजन संधी' ( Trutiy Vyanjan Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहबद्दल तिसरे वर्णसंधी
सत् + आनंदत् = दसदानंद
अप् + ज = बअब्ज
वट् + आनन = डवडानन
अच् + अंत = जअजंत
वाक् + देवी = गवाग्देवी

 


नियम ३] पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते. त्याला 'अनुनासिक संधी' ( Anunasik Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहकठोर व्यंजनसंधी
सत् + मार्गत् = न् सन्मार्ग
सत् + मतीत् = न् संमती
जगत् + नाथत् = न् जगन्नाथ
षट् + मास = णषण्मास
वाक् + निश्चय = वाड्निश्चय


 

 'त्' चे नियम


नियम १] ‘त्’ च्यापुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास ‘त्’ चा ‘च्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधी
चलत् + चित्रत् + च = चचलच्चित्र
सत् + चरित्रत् + च = चसच्चरित्र
उत् + छेद + छ = चउच्छेद

 

नियम २] ‘त्’ च्यापुढे ‘ज्’ किंवा ‘झ्’ आल्यास ‘त्’ चा ‘ज्’ होतो.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सत् + जनत् + ज = जसज्जन
शरत् + झंझावात + झ = जशरज्झंझावात
उत् + ज्वल + ज = जउज्ज्वल

 


नियम ३] ‘त्’ च्यापुढे ‘ड्’ आल्यास ‘त्’ चा ‘ड्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
भगवत् + डमरूत् + ड = डभगवड्डमरू
उत् + डानत् + ड = डउड्डान

 

नियम ४] ‘त्’ च्यापुढे ‘ट्’ आल्यास ‘त्’ चा ‘ट्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
तत् + टीकात् + ट = टतट्टीका

 

हे पण पहा :- विशेषण व त्याचे प्रकार



नियम ५] ‘त्’ च्यापुढे ‘ल्’ आल्यास ‘त्’ चा ‘ल्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
तत् + लीनत् + ल = लतल्लीन
उत् + लंघनत् + ल = लउल्लंघन

 

नियम ६] ‘त्’ च्यापुढे ‘श्’ आल्यास ‘त्’ चा ‘च्’ होतो. व ‘श्’ चा ‘छ्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सत् + शीलत् + श = च + छसच्छील
उत् + श्वासत् + श = च + छउच्छवास
सत् + शिष्यत् + श = च + छसच्छिष्य


हे पण पहा :- आलंकारिक शब्द

 'म्' चे नियम

नियम १] ‘म्’ च्यापुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म्’ मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास ‘म्’ बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

व्यंजन संधी चे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सम् + आप्तम् + आसमाप्त
सम् + आचारम् + आसमाचार
सम् + आलोचनम् + आसमालोचन
सम् + तापम् + त् संताप
सम् + गतीम् + ग् संगती
सम् + चयम् + च् संचय
सम् + कल्पम् + क् संकल्प
किम् + करम् + क् किंकर

          तुम्हाला व्यंजन संधी व त्याचे नियम ( Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi Vyanjan Sandhi v Tyache Niyam ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad