श्री दत्त आरती
Dattachi Aarti
श्री दत्त आरती ( Dattachi Aarti ) :-
आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच श्री दत्त आरती ( Dattachi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
श्री दत्त आरती
( Dattachi Aarti )
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्यान ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरति ओवाळीता हरली भवचिन्ता ॥
जय देव, जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक् दत्त ।
अभाग्यासी कैसी नकळे ही मात ।
पराही परतली कैसा हा हेत ।
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥
जय देव, जय देव
दत्त येऊनीया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होउनीया आशीर्वाद दिधला ।
जन्मा मरणाचा फेरा वाचविला ॥
जय देव, जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपले मन झले उन्मन |
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥
जय देव, जय देव
हे पण वाचा :- गणपतीची आरती संग्रह
हे पण वाचा :- गणपतीची आरती संग्रह
तुम्हाला श्री दत्त आरती | Dattachi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला श्री दत्त आरती | Dattachi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box