Easy Tricks For Two Digit Number Tables
दोन अंकी संख्यांचे पाढे काही सेकंदात बनवण्याची ट्रिक
Easy tricks for two digit number tables | दोन अंकी संख्यांचे पाढे काही सेकंदात बनवण्याची ट्रिक :-
गणित विषयाचा विचार केला तर पाढे पाठ केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गणित विषय शिकत असतानाच खऱ्या अर्थाने आपल्याला पाढे पाठ असणे किती महत्वाचे आहे ते समजते. परंतु सर्वच विद्यार्थ्यांपुढे पाठ करणे हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. पाढे पाठ करावे तर ते किती पर्यंत १५, २०, की ३० त्याला काही सीमा नाही परंतु शालेय विद्यार्थी म्हणा किंवा स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी कोणताही विद्यार्थी जास्तीत जास्त ३० अथवा ३५ यापुढे पाढे पाठ करू शकत नाही.
जर एखाद्या संख्येला एकूण ७३ किंवा ९७ यासारख्या मुळ संख्येने भाग घ्यायचा असेल तर मग तो अडचणीत सापडतो अशावेळी त्याचे गणित सोडवणे तिथेच थांबते. पण आता घाबरायचे काम नाही कारण ज्यांना १ ते ९ पर्यंत पाढे पाठ असतील ते सहज व काही सेकंदात ११ ते ९९ पर्यंत पाढे तयार करू शकतात. ते कसे चला तर बघूया.
पाढे तयार करण्यासाठी काही अटी :-
१) १ चे ९ पर्यंत पाढे पाठ असावेत.२) किमान दोन अंकी संख्यांची तोंडी बेरीज करता यावी.
३) एकच स्थान व दशक स्थान यांची स्थाने माहीत असावे.
पाढे तयार करण्याच्या पायऱ्या :-
१) अगोदर दशक स्थान च्या अंकाचा पाडा लिहून घेणे.२) एकक स्थानच्या अंकाचा पाढा त्याच्यासमोर लिहावा परंतु पाढा लिहीत असताना त्या पाड्यातील दशक स्थानचे अंक अगोदरच्या पाढया शेजारी लिहावे.
३) एकक स्थानचे अंक लिहून घ्यावे.
४) आता एकक स्थानच्या अंकासमोर अगोदर लिहिलेला दशक स्थानच्या अंकात नंतर लिहिलेले दशक स्थानचे अंक मिळून लिहावेत.
उदाहरणार्थ :-
७३ चा पाढा तयार करूया.
■ ७ चा पाढा
■ ३ चा पाढा
■ ७३ चा पाढा
७ ३ = ७३
१४ ६ = १४६
२१ ९ = २१९
२८ + १ २ = २९२
३५ + १ ५ = ३६५
४२ + १ ८ = ४३८
४९ + २ १ = ५११
५६ + २ ४ = ५८४
६३ + २ ७ = ६५७
७० + ३ ० = ७३०
अशा पद्धतीने आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा पाढा ( ११ ते ९९ ) काही सेकंदात तयार करू शकतो
हे पण वाचा :- सम संख्या व त्यावरील क्रिया
तुम्हाला Easy tricks for two digit number tables | दोन अंकी संख्यांचे पाढे काही सेकंदात बनवण्याची ट्रिक माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box