Even Number in Marathi
Sam Sankhya
सम संख्या
सम संख्या ( Even Number in Marathi | Sam Sankhya ):-
सम संख्या ( Even numbe in Marathi | Sam sankhya ) या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला सम संख्या ( Even number in Marathi | Sam sankhya ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी सम संख्या ( Even number in Marathi | Sam sankhya ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
चला तर मग आपण बघूया सम संख्या ( Even number in Marathi | Sam sankhya ).
सम संख्या म्हणजे काय?
ज्या संख्येला २ ने भागल्यास पूर्ण भाग जातो त्या संख्येला सम संख्या (Even numbers | Sam sankhya) असे म्हणतात.उदाहरणार्थ :- २, ४, ६, ८, १०, १२, १४,........... इत्यादी.
What is an even number?
Any number that can be exactly divided by 2 is called as an Even Number.
➤ Even numbers always end up with the last digit as :- 0, 2, 4, 6 or 8.
➤ Examples of even numbers are :- 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 etc
हे पण पहा :- संख्यांचे प्रकार
सम सख्यांची वैशिष्ट्ये ( Characteristics of even numbers ) :-
प्रत्येक संख्यांची काही वैशिष्ट्ये असतात तसेच सम संख्येची पण काही वैशिष्ट्ये आहेत ती पुढील प्रमाणे.१) सम संख्येच्या एकक स्थानी नेहमी ०, २, ४, ६ किंवा ८ यांपैकी एक अंक असतो.
उदाहरणार्थ :- १२, ५७४, ९,७३६, ७३,८७८, ५,८२,४१०.
२) सम संख्येला २ ने भागल्यास बाकी नेहमी शुन्यच उरते.
उदाहरणार्थ :-
२४८ ÷ २ = १२४ बाकी शून्य
१,२३४ ÷ २ = ६१७ बाकी शून्य
५३,६९,८६४ ÷ २ = २६,८४,९३२ बाकी शून्य
३) कोणत्याही दोन क्रमवार सम संख्येमध्ये २ चा फरक असतो.
उदाहरणार्थ :-
२ - ४, १६-१८, १३८ - १४०, ६,५३० - ६,५३२
४) कोणत्याही नैसर्गिक संख्याची दुप्पट ही नेहमी सम संख्याच असते.
उदाहरणार्थ :-
३ ची दुप्पट ६
१५ ची दुप्पट ३०
११८ ची दुप्पट २३६
३,६४८ ची दुप्पट ७,२९६
५) दोन किंवा अधिक सम संख्याची बेरीज केल्यास उत्तर हे नेहमी सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
२ + ६= ८
४ + १८ + ३० = ५२
६ + १४ + ४१६ + ३,००२ = ३४३८
६) कोणत्याही सम संख्येत १ मिळविल्यास उत्तर नेहमी विषम संख्या उत्तर मिळते.
उदाहरणार्थ :-
६ + १ = ७
२४ + १ = २५
४५८ + १ = ४५९
१,३५२ + १ = १,३५३
६,५४३० + १ = ६,५४३१
७) दोन किंवा अधिक सम संख्याची वजाबाकी केल्यास उत्तर हे नेहमी सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
८ - ६ = २
२४ - ६ = १८
४८६ - ९८ - ८ = ३८०
७,३५२ - ९७६ - ७४ - ४ = ६,२९८
८) कोणत्याही सम संख्येतून १ वजा केल्यास उत्तर नेहमी विषम संख्या उत्तर मिळते.
उदाहरणार्थ :-
६ - १ = ५
२४ - १ = २३
४५८ - १ = ४५७
१,३५२ - १ = १,३५१
६५,४३० - १ = ६५,४२९
९) दोन किंवा अधिक सम संख्याचा गुणाकार केल्यास उत्तर सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
४ × ८ = ३२
२८ × १२ = ३३६
३८६ × २२ × ४ = ३३,९६८
६,१२३ × २२१ × १८ × २ = ४८,७१४,५८८
१०) कोणत्याही सम संख्येला विषम संख्येने गुणल्यास गुणाकार सम संख्याच येते.
उदाहरणार्थ :-
२ × ३ = ६
२८ × ४३ = १,२०४
३८६ × १०१ = ३८,९८६
१,०२० × २,०५७ = २०,९८,१४०
हे पण पहा :- विभाज्यतेच्या कसोट्या
सम संख्यांचे ( Even numbers | Sam sankhya ) प्राथमिक क्रियाविषयक नियम :-
१) सम संख्या + सम संख्या = सम संख्याउदाहरणार्थ :- २ + ४ = ६
२) सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
उदाहरणार्थ :- ४ + ५ = ९
३) सम संख्या - सम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :- ८ - ६ = २
४) सम संख्या - विषम संख्या = विषम संख्या
उदाहरणार्थ :- ८ - ३ = ५
५) सम संख्या x सम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :- ४ × ८ = ३२
६) सम संख्या × विषम संख्या = सम संख्या
उदाहरणार्थ :- ४ × ३ = १२
A) दिलेली संख्या सम असल्यास त्या अगोदरची किंवा नंतरची सम संख्या विचारल्यास.
सम संख्या = a मानू
विचारलेली संख्या = b मानू
अगोदरची सम संख्या = a - ( 2 × b )
नंतरची सम संख्या = a + ( 2 × b )
उदाहरणार्थ :-
i) २२ नंतर क्रमाने येणारी ७३ वी सम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b )
= २२ + ( २ × ७३)
= २२ + १४६
= १६८
ii) २२ अगोदर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b )
= २२ - ( २ × ७)
= २२ - १४
= ८
B) दिलेली संख्या सम असल्यास त्या अगोदरची किंवा नंतरची विषम संख्या विचारल्यास.
सम संख्या = a मानू
विचारलेली संख्या = b मानू
अगोदरची सम संख्या = a - ( 2 × b - 1)
नंतरची सम संख्या = a + ( 2 × b - 1)
उदाहरणार्थ :-
i) २२ नंतर क्रमाने येणारी ७३ वी विषम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b - 1)
= २२ + ( २ × ७३ - १)
= २२ + ( १४६ - १)
= २२ + १४५
= १६७
ii) २२ अगोदर क्रमाने येणारी ७ वी विषम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b - 1)
= २२ - ( २ × ७ - १)
= २२ - ( १४ - १)
= २२ - १३
= ९
इतर काही उदाहरणे :-
१) P ही सम संख्या आहे तर क्रमाने येणारी ४ थी सम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b )
= P + ( २ × ४ )
= P + ८
२) P ही सम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी सम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b )
= P - ( २ × ४ )
= P - ८
३) P ही सम संख्या आहे तर क्रमाने येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b - 1)
= P + ( २ × ४ - १)
= P + ७
४) P ही सम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b - 1)
= P - ( २ × ४ - 1)
= P - ७
५) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६+२)
४y+८
कोणत्याही दोन सम संख्येत २ चा फरक असतो.
६) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६-२)
४y+४
कोणत्याही दोन सम संख्येत २ चा फरक असतो.
७) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६+१)
४y+७
सम व विषम संख्येत १ चा फरक असतो.
६) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६-१)
४y+५
सम व विषम संख्येत १ चा फरक असतो.
सूत्र = a + ( 2 × b )
= P + ( २ × ४ )
= P + ८
२) P ही सम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी सम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b )
= P - ( २ × ४ )
= P - ८
३) P ही सम संख्या आहे तर क्रमाने येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a + ( 2 × b - 1)
= P + ( २ × ४ - १)
= P + ७
४) P ही सम संख्या आहे तर क्रमाने आगोदर येणारी ४ थी विषम संख्या कोणती?
सूत्र = a - ( 2 × b - 1)
= P - ( २ × ४ - 1)
= P - ७
५) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६+२)
४y+८
कोणत्याही दोन सम संख्येत २ चा फरक असतो.
६) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी सम संख्या कोणती?
४y+ (६-२)
४y+४
कोणत्याही दोन सम संख्येत २ चा फरक असतो.
७) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६+१)
४y+७
सम व विषम संख्येत १ चा फरक असतो.
६) ४y+६ ही सम संख्या आहे तर त्या अगोदरची क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
४y+ (६-१)
४y+५
सम व विषम संख्येत १ चा फरक असतो.
हे पण पहा :- बीजगणितातील महत्वाची सूत्रे
तुम्हाला सम संख्या | Sam sankhya | Even number in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box