गणपती आरती संग्रह | Ganapti Aarti Sangrah - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 19, 2023

गणपती आरती संग्रह | Ganapti Aarti Sangrah

गणपतीची आरती संग्रह

Ganapti Aarti Sangrah

गणपती आरती संग्रह | Ganapti Aarti Sangrah

गणपती आरती संग्रह ( Ganapti Aarti Sangrah ) :- 

          आपले कोणतेही काम शुभ होण्यासाठी आपण सर्वप्रथम देवाची आराधना करतो व त्यातून आमचे निर्विघन व चांगले होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच गणपती आरती संग्रह ( Ganapti Aarti Sangrah ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
            चला तर मग पाहूया गणपती आरती संग्रह ( Ganapti Aarti Sangrah ).  


गणपती आरती संग्रह

Ganapti Aarti Sangrah


अ.क्र.गणपती आरती संग्रह

सुखकर्ता दुखहर्ता

जय देव जय देव जय मंगलमूर्ती

तू सुखकर्ता

घालीन लोटांगण

प्रथम तुला वंदितो

काकड आरती

शेंदुर लाल चढायो

मंत्र पुष्पांजली

अथ संकटनाशनगणेश स्त्रोत्रम्
१०
गणपती स्तोत्र
११
जाहले भजन आम्ही नमितो
१२
गणपति श्लोक
१३
जय देव, जय देव, जय वक्रतुंडा
१४
कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे
१५
नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें


सुखकर्ता दुखहर्ता

Sukh karta dukh harta

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥२॥

जय देव जय देव..

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ ३ ॥

जय देव.. जय देव..


जय देव जय देव जय मंगलमूर्ती

Jay dev Jay dev Jay Msngal murti


जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ २ ॥
जय देव

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥३॥
जय देव, जय देव


तू सुखकर्ता

Tu Sukh karta Tu Dukh harta

तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥

मंगलमूर्ति तूं गणनायक ।
वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारीं आज पातलों ।
नेईं स्थितिप्रति राया ॥१॥

संकटीं रक्षीं...

तूं सकलांचा भाग्यविधाता ।
तूं विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा ।
निमवीं नैराश्याला ॥२॥

संकटीं रक्षी...

तूं माता, तुं पिता जगं या ।
ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥
पामर मी स्वर उणें भासती ।
तुझी आरती गाया ॥३॥

संकटीं रक्षी ...

मंगलमूर्ति मोरया ।
गणपतीबाप्पा मोरया ॥


घालीन लोटांगण

Ghalin Lotangan

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् 
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् 
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम, हरे राम, 
राम राम हरे हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, 
कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।


प्रथम तुला वंदितो

Pratham Tula Vandito

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया... ॥धृ॥

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, 
दुरित तिमिर हारका  
सुखकारक तू दुःख विदारक, 
तूच तुझ्यासारखा 
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, 
विनायका प्रभुराया ॥१॥

सिद्धिविनायक तूच अनंता, 
शिवात्मजा मंगला 
सिंदूर वदना, विद्याधिशा, 
गणाधिपा वत्सला 
तुच ईश्वरा साह्य करावे, 
हा भवसिंधु तराया ॥ २ ॥

गजवदना तव रूप मनोहर, 
शुक्लांबर शिवसुता 
चिन्तामणी तू अष्टविनायक, 
सकलांची देवता 
रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा 
देई कृपेची छाया ॥३॥


काकड आरती

Kakad Aarti

उठा उठा हो सकळिक ।
वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धिसिद्धिंचा नायक ।
सुखदायक भक्तांसी ॥ध्रु.॥ ।

अंगी शेंदुराची उटी ।
माथां शोभतसे कीरिटी ।
केशर कस्तुरी लल्लाटीं ।
हार कंठी साजिरी ॥१॥

कानीं कुंडलांची प्रभा ।
सूर्यचंद्र जैसे नभा ।
माजीं नागबंदशोभा ।
स्मरतां उभा जवळी तो ॥२॥

कांसे पीतांबराची घटी।
हाती मोदकाची वाटी ।
रामानंद स्मरतां कंठीं ।
तो संकटीं पावतो ॥ ३ ॥


शेंदुर लाल चढायो

Shendur Lal Chadhayo

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको।।
दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ।।
हाथ लिए गुडलड्डू साईं सुरवरको ।।
महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको ।। १ ।।

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।।

धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।

अष्तो सिद्धि दासी संकटको बैरी।।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।।
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी।।
गंडस्थल मद्मस्तक झूले शशिहारी।। २ ।।

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।।
धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।

भावभागत से कोई शरणागत आवे ।।
संतत संतत सभी भरपूर पावे।।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे || ३ ||

जय जय श्री गणराज विध्यासुख्दाता।।

धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ।।


मंत्र पुष्पांजली

Mantr Pushpanjali

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि
धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान:
सचंत यत्र पूर्वे साध्या:
संति देवा: ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं ।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नमः ।
ॐ स्वस्ति।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं
महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात्
सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै
समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो
मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।


अथ संकटनाशनगणेश स्त्रोत्रम्

Atha Sankatnashn Ganesh Stotrm

श्रीगणेशाय नमः । नारदउवाच ।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रे विनायकम् ।
भक्त्या व्यासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिध्दये॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णम् तथाष्टमम् ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद् गणपतिस्तोत्रम् षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेणं सिध्दींच लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रम् संपूर्णम् ।


गणपती स्तोत्र

Ganpati Stotr

जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ॥

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे 
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥

गजवदना श्री लंबोदरा, सिध्दीविनायका भालचंद्रा ।
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥

भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥

विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥

नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥

नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥

मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥

मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥

मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥

हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिध्दीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥

त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥

होईल सिध्दी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥

इती श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्। 
श्री गजाननार्पणमस्तु ।


जाहले भजन आम्ही नमितो

Jahalo Bhajan Amhi Namito

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा ।
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची 
ध्यातो प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना,
देवा हेची वासना रक्षुनियां सकळा
द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते देवा आता एकची आहे आता 
एकची आहे तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया प्रेमानंदे लागू
देवा ऐशा या ठाया तुझी कीर्ति गावया ॥४॥

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा 
आमुच्या मनी हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनिया संकटे आता आमुची सारी देवा 
आमुची सारी कृपेची साऊली देवा दीनावरि करी ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी देवा 
तुम्हा असावी आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा 
आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥


हे पण पहा :- १६ महाजन पदे


गणपति श्लोक

Ganpati Shlok

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे ।
कविं कविनां उपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः ।
शृण्वन् ऊतिभिः सीदसादनम् ।।


जय देव, जय देव, जय वक्रतुंडा

Jay dev Jay dev Jay Vakrtunda

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ।। जय ।। धृ ।।

प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला ।
रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ।। जय ।। १ ।।

सारीगमपधनीसप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ।
तातक् तातक् थैय्या करिसि आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ।। जय ।। २।।

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलङ्कधर शोभित शुभवदना ।
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ।। जय ।। ३ ।।


कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे

Kapol Zarati Mande

कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे ।
शेंदुर जो घवघवीत अद्भुत सुविराजे ।
घागरियांचा घोळ पदीं घुळघुळ वाजे ।
प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ।। १ ।।

जय देव जय देव गजनरवेषा ।
आरती ओवाळू तुजला विश्वेशा ।। धृ ।।

विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा ।
हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा ।
अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा ।
ताण्डवनृत्य करिसी तातक् धिम ताथा ।। जय || २ ||


विद्या धनसंपदा कनकाच्या राशी ।
नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी ।
निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी ।
गोसावीनंदन गातो कवितांशी ।। जय ।। ३ ।।


नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें

Nana parimal durva shendur shamiptre

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसें पूजन केल्या बेएजाक्षर मंत्रें ।
अष्तहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।
तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ धृ ।।
तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती || जय देव || २ ||

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ।।
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीं ।। जय देव || ३ ||

          तुम्हाला गणपती आरती संग्रह | Ganapti Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad