हरतालिकेची आरती
Hartalikechi Aarti
हरतालिकेची आरती | Hartalikechi Aarti
जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।।
आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ।। धृ ।।
हरअर्धांगीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ।।
तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ।। १ ।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ।। २ ।।
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ।।
केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकर ।। ३ ।।
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ।।
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ।। ४ ।।
काय वर्ण तव गुण । अल्पमति नारायण ।।
मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ।। ५ ।।
तुम्हाला हरतालिकेची आरती | Hartalikechi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला हरतालिकेची आरती | Hartalikechi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box