मंगळागौरीची आरती | Mangla Gauri Aarti - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 4, 2023

मंगळागौरीची आरती | Mangla Gauri Aarti

मंगळागौरीची आरती

Mangla Gauri Aarti

मंगळागौरीची आरती | Mangla Gauri Aarti


मंगळागौरीची आरती
( Mangla Gauri Aarti )

जय देवी मंगळागौरी । 
ओंवाळीन सोनियाताटीं ।।
रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ॥ धृ ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या । 
प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।।
तिष्ठली राज्यबाळी । 
अयोषण द्यावया ।।१।।

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । 
सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।।
सोळा परींची पत्री । 
जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ।।२।।

साळीचे तांदुळ मुगाची डाळ । 
आळणीं खिचडी रांधिती नारी ।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।३।।

डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । 
कळावी कांकणें गौरीला शोभती ।।
शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ।।४।।

न्हाउनी माखुनी मौनी बैसली । 
पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।५।।

सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । 
मध्यें उजळती कापुराच्या वाती ।।
करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्स पक्वानें । तटीं भरा बोनें ।।६॥

लवलाहें तिघें काशीसी निघाली । 
माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।।
मागुती परतुनीयां आली । 
अंबा स्वयंभू देखिली ।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ।।७।।

हे पण वाचा :- हरतालिकेची आरती

          तुम्हाला मंगळागौरीची आरती | Mangla Gauri Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad