मराठी सुविचार | Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 23, 2023

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi

Marathi Suvichar

मराठी सुविचार

Motivational Good Thoughts in Marathi

मराठी सुविचार | Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi

मराठी सुविचार ( Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi ) :-

            सुविचार ( Suvichar | Good Thoughts ), या शब्दाचा अर्थच चांगला विचार आहे. नमस्कार मित्रानो मराठी सुविचार ( Marathi Suvichar | Good Thoughts in Marathi | Suvichar Marathi ) हा एक खुप छान मार्ग आहे आपल्या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी, जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते. त्यासाठीच मी तुमच्यासाठी मराठी सुविचार | Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi  घेऊन आलो आहे. मला आशा आहे कि ते तुम्हाला आवडतील.


Marathi Suvichar

मराठी सुविचार

Motivational Good Thoughts in Marathi

सुविचार मराठी छोटे [ Suvichar Marathi Chote ]



शहाण्याला शब्दांचा मार.

 श्रम हेच जीवन.

 चकाकते ते सर्व सोन नसते.

⏩ कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.

 मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.

 रिकामे डोके शैतानाचे घर असते.

⏩ चरित्र हाच खरा इतिहास असतो.

⏩ माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.

⏩ पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.

⏩ ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.

हे पण पहा :- हिंदी बोधकथा

 चारित्र्य म्हणजे नियती.

⏩ संयम हेच खरे औषध.

 सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.

⏩ मैत्री म्हणजे समानता.

 निसर्ग हाच खरा कायदा.

⏩ आपण श्रद्धेवर जगत असतो.

⏩ श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.

⏩ दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.

⏩ मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.

 घाबरटाला सारेच अशक्य असते.

⏩ सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.

⏩ ज्ञान तेथे मान .

⏩ लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.

⏩ नव्या पुस्तकाइतके जुने काहीच नाही.

⏩ परमेश्वर एकच आहे, पण रूप अनेक आहेत.

⏩ भाग्य नेहमी धैर्यवानालाच अनुकूल असते.

⏩ चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.

⏩ पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.

⏩ दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.

 संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.

⏩ सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.

⏩ सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.

⏩ अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.

 मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.

 जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.

 खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.

 संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.

⏩ आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.

⏩ मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.

⏩ मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय.


⏩ माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.

⏩ यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.

⏩ शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

⏩ पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.

⏩ वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते.

⏩ ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.

⏩ एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.

 कला म्हणजे एखादी वस्तू नाही, तो एक मार्ग आहे.

⏩ गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.

⏩ ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.

⏩ कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.

⏩ खोटेपणा करणारा चोरांपेक्षाही वाईट असतो.

⏩ बघणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य असते.

⏩ जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो

⏩ सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य.

⏩ खरा मनुष्य कोणाचाच व्देष करत नाही.

⏩ संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.

⏩ संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

⏩ जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.

⏩ जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.

⏩ अंधश्रद्धे पेक्षा मौन कधीही चांगले.

⏩ तोंड बंद ठेवलं तर, तर मासाही अडचणीत येत नाही.

 महान माणसांची माने साधी असतात.

⏩ जबाबदारी पडली कि ती शिकवतेच.

⏩ जो एकांतात राहू शकतो तो खरोखरच महान असतो.

⏩ धडपडी नंतर विश्रांती सुखकर असते.

⏩ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते.

⏩ श्रीमंत व्यक्तींना पुष्कळ मित्र असतात.

⏩ स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.

 प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.

⏩ भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.

⏩ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते.

⏩ मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.

⏩ संयम नावाच्या कटू वृक्षाचे फळे नेहमी गोड असतात.

⏩ श्रम संपले म्हणजे आनंद होतो.

⏩ थोर कार्य ही थोर मनाची प्रतीके असतात.

⏩ पश्चाताप हा दुर्बल माणसांचा सद्गुण होय.

हे पण पहा :- देशभक्ति गीत

 कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.

⏩ जो नेहमी हसतो तो नेहमी विजय होतो.

⏩ जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.

⏩ मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.

⏩ स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.

⏩ खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.

⏩ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.

⏩ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.

⏩ इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.

⏩ जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.

⏩ जो वेळ काढतो त्याला सर्व काही मिळते.

⏩ माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.

⏩ स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.

⏩ दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

 विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.

⏩ स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही

 ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.

⏩ जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.

 जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.

⏩ निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा, संयम हे त्याचे रहस्य होय.

⏩ जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.

⏩ वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे वेळ न मिळाल्यासारखेच आहे.

⏩ विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटण.

⏩ ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.

 चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.

 आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.

⏩ द्वेष करणे सोपे असते,पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.

 विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.

 बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.

 विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

 स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

 एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.

⏩ सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.

⏩ जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.

⏩ माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.

⏩ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.


⏩ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.

⏩ काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही

⏩ द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.

⏩ चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते.

⏩ जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.

⏩ संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.

⏩ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.

⏩ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही.

⏩ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.

⏩ मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही.

⏩ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.

⏩ सर्वांचे ऐकून घ्या, पण फार थोड्यांजवळ स्वतः चे मन मोकळे करा.

⏩ उधळेपणा दुर्बल स्वभावाचा दुर्गुण आहे.तत्परता हा व्यवसायाचा आत्मा आहे.

⏩ सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.

⏩ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.

⏩ जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.

⏩ संशयातून संशयच उत्पन्न होतो.

⏩ वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.

⏩ जो बदलत नाही तो असमंजस असतो.

⏩ कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.

हे पण पहा :- मराठी बोधकथा

⏩ सर्व गोष्टींच्या बाबतीत नेहमीच निराशेपेक्षा आशा बाळगणे चांगलेच असते.

 इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.

⏩ प्रेम काढून टाकल्यास आपले जग थडग्यावत होईल.

⏩ कामात मग्न असणाऱ्यांना अश्रू ढाळायला वेळ मिळत नाही.

⏩ सहनुभूती ही जीवनातील सुंदर गोष्ट आहे.

⏩ इच्छापूर्ती झाली म्हणजे ती आत्म्याला मधुर वाटते.

⏩ फसविण्यात अत्यंत सोपी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः च होय.

⏩ या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणे.

⏩ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते.

⏩ वर्तमानकाळ हा भविष्यकाळ विकत घेत असतो.

⏩ माणूस जितका मूर्ख, तितका तो खोटा बोलणारा असतो.

⏩ सत्याचा खरा मित्र म्हणजे काळ.

⏩ अशक्य गोष्ट ती कि जिच्यासाठी प्रयत्न केलेले नसतात.

⏩ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.

⏩ जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.

⏩ दिवस कितीही मोठा असला तरीही त्याचा अंत होतोच.

⏩ तलवारीपेक्षा लेखणीचे सामर्थ्य अधिक असते.

⏩ श्रम करणाऱ्याला गोड झोप लागते.थोड्या आनंदात गोडी असते.

⏩ द्वेष करणाऱ्या माणसाची नजर फार तीक्ष्ण असते.

⏩ दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

⏩ आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजयी होऊ शकतात.

⏩ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.

⏩ उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.

⏩ चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.

⏩ सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.

⏩ श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.


⏩ माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.

 खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.

 स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

 चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.

 भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

⏩ जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

 नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.

⏩ मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.

⏩ जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.

 विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.

⏩ खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?

⏩ दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

⏩ लहान मुले म्हणजे देवा घरची फुलच.जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.

⏩ करू ना ! काय घाई आहे, म्हटलं कि ती गोष्ट होतचं नाही. आजचा दिवसच योग्य.

 कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

 नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

हे पण पहा :- मराठी भाषा गौरव दिन


          तुम्हाला मराठी सुविचार | Marathi Suvichar | Motivational Good Thoughts in Marathi | Maerathi Good Thoughts | Marathi Chote Suvichar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad