MPSC
Maharashtra Public Service Commission
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
आपल्या सर्वांनाचीच ईछा असते की आपणही मोठे अधिकारी व्हावे आपल्याकडे लाल दिव्याची गाडी असावी आपल्या हाताखाली मोठमोठे अधिकारी असावेत. पण हे शक्य कसे होणार यासाठीच मी ही माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
आपण सतत आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडून ऐकत असाल की आता चांगला अभ्यास कर म्हणजे MPSC ला तुला याचा फायदा होईल. खऱ्या अर्थाने इयत्ता ५ वी ही MPSC अभ्यासाची सुरुवात असते किंवा आपण त्याला MPSC चा पाया देखील म्हणू शकतो व हा पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला नवोदय, स्कॉलरशिप, व इतर शालेय स्पर्धेत भाग घ्यायला हवा. चला तर मग बघू MPSC म्हणजे काय?
MPSC (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यातील विविध शासकीय नागरी सेवेतील नोकरीसाठी अर्जदारांच्या योग्यतेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार निवडण्यात येतात. निवडण्यात येनारे उमेदवार महाराष्ट्र सरकारच्या सुरळीत आणि कार्यक्षम कार्याची सुविधा देते आणि भरती तयार करण्यासारख्या विविध सेवाविषयक बाबींवर त्यांना सल्ला देतात. नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या क्रियांचा सल्ला इ कामे करतात.
कार्यालय :-
महाराष्ट्र राज्य राजधानी मुंबई येथे एम.पी.एस.सी. चे मुख्य कार्यालय आहे.एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा :-
- राज्य सेवा परीक्षा
- कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
- वन सेवा परीक्षा
हे पण पहा :- सर्वनाम
एम.पी.एस.सी. परीक्षेमार्फत भरलेली पदे :-
गट 'अ' राजपत्रित पद :-
- उपजिल्हाधिकारी
- पोलिस उपअधीक्षक
- सहजिल्हा उपनिबंधक
- उप अभियंता
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी
- सहाय्यक कार्यकारी अभियंता
- सहाय्यक अभियंता
- विक्री कर सहाय्यक आयुक्त
- पशुधन विकास अधिकारी
- मुख्य अधिकारी, नगरपालिका
- गटविकास अधिकारी
- वित्त व लेखाधिकारी
- उपविभागीय कृषि अधिकारी
- सहाय्यक विद्युत निरीक्षक
- विद्युत निरीक्षक
- व्याख्याता
- भूमी अभिलेखांचे उपपरिरक्षक
- सहाय्यक वनसंरक्षक
- तहसीलदार
- नगररचनाकार
गट 'ब' राजपत्रित पद :-
- तालुका कृषी अधिकारी
- सर्कल अॅग्री ऑफिसर
- जिल्हा शिक्षणाधिकारी
- सीडीपीओ
- नायब तहसीलदार
- गटविकास अधिकारी
- मुख्य अधिकारी
- सहाय्यक अभियंता
- आरएफओ
- उद्योग अधिकारी
- सहाय्यक शहर नियोजक
गट 'ब' नॉन-राजपत्रित पद :-
- पोलिस उपनिरीक्षक
- राज्य कर निरीक्षक
- सहाय्यक डेस्क अधिकारी
गट 'क' नॉन-राजपत्रित पद :-
- कर सहाय्यक
- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
- लिपिक टायपिस्ट
अभ्यासक्रम आणि स्वरूप :-
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील.पेपर- १
- २०० गुणांसाठी, २ तास कालावधी असेल.- राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.
- भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
- महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.
महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी
आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान
1) वस्तुनिष्ठवर आधारीत प्रश्न
यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे.4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा.
पेपर- २
- २०० गुणांसाठी, २ तास कालावधी असेल.आकलन (कॉम्प्रिहेन्शन) वर आधारीत प्रश्न
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) वर आधारीत प्रश्नतर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग) वर आधारीत प्रश्न
सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी) वर आधारीत प्रश्न
बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)
हे पण पहा :- तत्सम शब्द
कॉम्प्रिहेन्शन :
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उताऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत.डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील.जनरल मेंटल एबिलिटी :
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग , डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान , प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती , ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल.हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात. तुम्हाला MPSC - महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box