शंकराची आरती संग्रह | Shankarachi Aarti Sangrah - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, September 3, 2023

शंकराची आरती संग्रह | Shankarachi Aarti Sangrah

शंकराची आरती संग्रह

Shree Shankarachi Aarti Sangrah 

शंकराची आरती संग्रह | Shankarachi Aarti Sangrah

श्री शंकराची आरती संग्रह ( Shree Shankarachi Aarti Sangrah ) :- 

          आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच श्री शंकराची आरती ( Shree Shankarachi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.


श्री शंकराची आरती संग्रह ( Shree Shankarachi Aarti Sangrah ) :-

    १) लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा आरती

    २) कर्पूरगौरा गौरिशंकरा आरती

    ३) श्री त्र्यंबकेश्वराची आरती

    ४) जय देव जय देव श्रीमंगेशा आरती

    ५) ओम जय शिव ओंकारा आरती


लवथवती विक्राळा

( Lavthavti Vikrala )

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ||
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥

जय देव... जय देव...

देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥

जय देव... जय देव...

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥

जय देव... जय देव...


कर्पूरगौरा गौरिशंकरा

( Karpurgaura Gaurishankara  )

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ ध्रु ॥

त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥

ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥


श्री त्र्यंबकेश्वराची आरती

( Shri Tryambakeshwarachi Aarti  )

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥

पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ १ ॥

जय जय...

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णं किती हो ॥
आणिकही बहु तीर्थे गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ २ ॥

जय जय...

ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ ३ ॥

जय जय...

लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ ४ ॥

जय जय...


जय देव जय देव श्रीमंगेशा

( Jay Dev Jay Dev Shrimangesha  )

जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।।धृ।।

सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ।।
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंभर विरुदे हें नम संकट धारीं ।। जय ।। १ ।।

भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ।।
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनव कृपाकटाक्षं मतिउत्सव द्यावा ।। जय || २ ||

शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ।।
कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा || जय || ३ ||


ओम जय शिव ओंकारा

( Om Jay Shiv Omkara  )

ओम जय शिव ओंकारा, स्वामी जय शिव ओंकारा। 
ब्रह्मा, विष्णु, सदाशिव, अर्द्धांगी धारा॥
ओम जय शिव ओंकारा॥

एकानन चतुरानन पञ्चानन राजे। 
हंसासन गरूड़ासन वृषवाहन साजे॥
ओम जय शिव ओंकारा॥

दो भुज चार चतुर्भुज दसभुज अति सोहे। 
त्रिगुण रूप निरखते त्रिभुवन जन मोहे॥
ओम जय शिव ओंकारा॥

अक्षमाला वनमाला मुण्डमालाधारी। 
त्रिपुरारी कंसारी कर माला धारी॥
ओम जय शिव ओंकारा॥

श्वेताम्बर पीताम्बर बाघम्बर अंगे। 
सनकादिक गरुड़ादिक भूतादिक संगे॥
ओम जय शिव ओंकारा॥

कर के मध्य कमण्डलु चक्र त्रिशूलधारी। 
सुखकारी दुखहारी जगपालनकारी॥
ओम जय शिव ओंकारा॥

ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका। 
मधु-कैटभ दो‌उ मारे, सुर भयहीन करे॥
ओम जय शिव ओंकारा॥

लक्ष्मी, सावित्री पार्वती संगा। 
पार्वती अर्द्धांगी, शिवलहरी गंगा॥
ओम जय शिव ओंकारा॥

पर्वत सोहैं पार्वती, शंकर कैलासा। 
भांग धतूर का भोजन, भस्मी में वासा॥
ओम जय शिव ओंकारा॥

जटा में गंग बहत है, गल मुण्डन माला। 
शेष नाग लिपटावत, ओढ़त मृगछाला॥
ओम जय शिव ओंकारा॥

काशी में विराजे विश्वनाथ, नन्दी ब्रह्मचारी। 
नित उठ दर्शन पावत, महिमा अति भारी॥
ओम जय शिव ओंकारा॥

त्रिगुणस्वामी जी की आरति जो कोइ नर गावे। 
कहत शिवानन्द स्वामी, मनवान्छित फल पावे॥
ओम जय शिव ओंकारा॥
ओम जय शिव ओंकारा॥


          तुम्हाला श्री शंकराची आरती संग्रह | Shankarachi Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad