दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
SSC-HSC supplementary Result Announced
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ( SSC-HSC supplementary Result announced ) झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान घेतलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक २८-०८-२०२३ रोजी दुपारी १ वाजता Online पद्धतीने जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर पाहता येतील व त्याची छायांकित प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. जुलै-ऑगस्ट २०२३ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
हे पण पहा :- दहावी व बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक
तुम्हाला दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर | SSC-HSC supplementary Result Announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box