तुळशीची आरती
Tulashichi Aarti
तुळशीची आरती ( Tulashichi Aarti ) :-
आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच तुळशीची आरती ( Tulashichi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
तुळशीची आरती
जय देवी जय देवी जय तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥ धृ ॥
ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखा परिवारीं ।।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥ १ ॥
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ।। २ ।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ।। ३ ।।
हे पण वाचा :- हरितालिकेची आरती
हे पण वाचा :- हरितालिकेची आरती
तुम्हाला तुळशीची आरती | Tulashichi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला तुळशीची आरती | Tulashichi Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box