वटसावित्रीची आरती
Vat Savitri Aarti
वटसावित्रीची आरती
( Vat Savitri Aarti )
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।।
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ।।
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥
आरती वडराजा ।। १ ।।
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।।
भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ।। धृ ।।
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ।।
त्रिरात्र व्रत करूनीया | जिंकी तूं सत्यवंताशी ।
आरती वडराजा ॥२॥
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ||
धर्मराजा उचकला। हत्या घालील जीवाला ।
येई ग पतिव्रते ।। पती नेई गे आपुला ।।
आरती वडराजा ।। ३।।
जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ।।
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ।।
आरती वडराजा ।।४।।
पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ।।
तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ।।
आरती वडराजा ।। ५ ।।
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ।।
स्वर्गी पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती ।
अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ॥ ६॥
हे पण वाचा :- विठ्ठलाची आरती संग्रह
हे पण वाचा :- विठ्ठलाची आरती संग्रह
तुम्हाला वटसावित्रीची आरती | Vat Savitri Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला वटसावित्रीची आरती | Vat Savitri Aarti ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box