श्री विष्णूची आरती संग्रह
Shree Vishnu Aarti Sangrah
Shree Hari Aarti Sangrah
Shree Vishnuchi Aarti Sangrah
श्री विष्णूची आरती संग्रह ( Shree Vishnu Aarti Sangrah ) :-
आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच श्री विष्णूची आरती संग्रह ( Shree Vishnu Aarti Sangrah ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
श्री विष्णूची आरती संग्रह ( Shree Vishnu Aarti Sangrah ) :-
१] संतसनकादिक भक्त मिळाले
२] ओवाळू आरती मदन गोपाळा
३] आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें
४] भगवान जगदीश्वर की आरती
५] श्री व्यंकटेश आरती
संतसनकादिक भक्त मिळाले
(Santsankadik Bhakt Milae)
संतसनकादिक भक्त मिळाले अनेक ।
स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ।। १ ।।
नवल होताहे आरती देवाधिदेवा ।
स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।। धृ ।।
नर नारी तटस्थ टक पडिलें नयना ।
ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना ।। नवल || २ ||
एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती ।
मंगल कौतुकें गाती ।
मिळाले वैष्णव जयजयकारें गर्जती । नवल || ३ ||
ओवाळू आरती मदन गोपाळा
(Ovalu Aarti Madan Gopala)
ओवाळू आरती मदन गोपाळा |
श्यामसुंदर गला वैजंतीमाळा ||धृ|
चरणकमळ ज्याचे अति सुकुमार |
ध्वजवज्रकुश बिद्राचा तोडर ||१||
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल लंचन ||२||
मुखकमल पाहंता सुखाचिया कोटी |
वेधीयेले मानस हरपली दृष्टी ||३||
जडित मुकट ज्याचा देदीप्यमान |
तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन ||४||
एका जनार्दनी देखियले रूप |
रूपपाहता जाहले अवघे तद्रूप ||५||
ओवाळू आरती ||
हे पण वाचा :- गणपतीची आरती संग्रह
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें
(Aavadi Gangajale Deva Nhanile)
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें ।
भक्तीचें भूषण प्रेमे सुगंध अर्पिले ।।१।।
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढे ।
जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ।।२।।
रमावल्लभदासे अहं ।।
धूप जाळीला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।।३।।
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा ।
समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।१।।
हरिख हरिक होता मुख पाहतां ।
चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।।२।।
सद्भवालागी बहु हा देव भुकेला ।
रमावल्लभ दासे अहं नैवेद्य अर्पिला ।।३।।
फळे तांबूल दक्षणा अर्पिली ।
तया उपरी निरांजने मांडिली ।।१।।
आरती करुं गोपा । मी तूं पण सांडोनि वेळोवेळा ।
पंचप्राण पंचज्योती आरती उजळली ।
दृश्य हे लोपले । तया प्रकाशांतळी ।।२।।
आरती प्रकाशे चंद्र सूर्य लोपले ।
सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।।३।।
देवभक्त पण न दिसे कांही ।
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ।। आरती०।।४।।
भगवान जगदीश्वर की आरती
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे
(Bhagavan Jagdishwar Aarti)
( Om Jay Jagdisha Hare Swami Jay Jagdish Hare )
ॐ जय जगदीश हरे, स्वामी! जय जगदीश हरे।
भक्तजनों के संकट क्षण में दूर करे॥
जो ध्यावै फल पावै, दुख बिनसे मन का।
सुख-संपत्ति घर आवै, कष्ट मिटे तन का॥ ॐ जय...॥
मात-पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी।
तुम बिनु और न दूजा, आस करूं जिसकी॥ ॐ जय...॥
तुम पूरन परमात्मा, तुम अंतरयामी॥
पारब्रह्म परेमश्वर, तुम सबके स्वामी॥ ॐ जय...॥
तुम करुणा के सागर तुम पालनकर्ता।
मैं मूरख खल कामी, कृपा करो भर्ता॥ ॐ जय...॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति।
किस विधि मिलूं दयामय! तुमको मैं कुमति॥ ॐ जय...॥
दीनबंधु दुखहर्ता, तुम ठाकुर मेरे।
अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे॥ ॐ जय...॥
विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा।
श्रद्धा-भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा॥ ॐ जय...॥
तन-मन-धन और संपत्ति, सब कुछ है तेरा।
तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा॥ ॐ जय...॥
जगदीश्वरजी की आरती जो कोई नर गावे।
कहत शिवानंद स्वामी, मनवांछित फल पावे॥ ॐ जय...॥
हे पण वाचा :- ज्ञानेश्वरांची आरती
श्री व्यंकटेश आरती
शेषाचल अवतार तारक तूं देवा
( Shree Vyanktesh Aarti )
(Sheshachal Avtar Tarak tu Deva )
शेषाचल अवतार तारक तूं देवा ।
सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ।।
कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा ।
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ।।१।।
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवळ करुणासिंधू पुरवीसी आशा ।। धृ ।।
हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ।।
देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें ।
ध्यातों तुजला श्रीपति दृढ मानस होतें ।। जय || २ ||
हे पण वाचा :- हरतालिकेची आरती
तुम्हाला श्री विष्णूची आरती संग्रह | Shree Vishnu Aarti Sangrah | Shree Hari Aarti Sangrah | Shree Vishnuchi Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला श्री विष्णूची आरती संग्रह | Shree Vishnu Aarti Sangrah | Shree Hari Aarti Sangrah | Shree Vishnuchi Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box