विठ्ठलाची आरती
Vithalachi Aarti Sangrah
विठ्ठलाची आरती ( Vithalachi Aarti ) :-
आपण कोणतेही काम शुभ होण्यासाठी देवाची आराधना करतो व त्यातून आमचे चांगले व निर्विघन होवो अशी प्रार्थना करतो. त्यासाठी आपण आरती म्हणतो अशाच विठ्ठलाची आरती ( Vithalachi Aarti ) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या आरती संग्रहात तुम्हाला पुढील आरती मिळतील.
विठ्ठलाची आरती संग्रह ( Vithalachi Aarti Sangrah ) :-
१) युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा आरती
२) येई हो विठ्ठले माझे माऊली ये आरती
३) ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा आरती
४) आरती अनंतभुजा
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा
( Yuge Athavis Vitevari Ubha )
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा ।
पावे जिवलगा ।। जय देव
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनूमंत पुढे उभे राहती । जय देव
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाइ राणीया सकळा ।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।। जय देव
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय देव
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ जय देव
येई हो विठ्ठले माझे माऊली ये
( Yeai Ho Vithale Maze Mauli )
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।।धृ ।।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ।। ३ ।।
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा
( Ovalu G Maye Vithal )
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं ।। १ ।।
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळूं || २ ||
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।
शङ्गचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। ओवाळूं ।। ३ ।।
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ।। ओवाळूं ।। ४ ।।
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।
समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ।।५।।
आरती अनंतभुजा
( Aarti Anantbhujachi )
आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा ।।
न चलती उपचार । मनें सारिली पूजा ।। धृ ।।
परेस पार नाहीं । न पडे निगमा ठायीं ।।
भुलला भक्तिभावें । लाहो घेतला देहीं ।। आरती ।। १ ।।
अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ।।
रामाजनार्दनीं । पायीं जोडिली वीट ।। आरती ।। २ ।।
तुम्हाला विठ्ठलाची आरती संग्रह | Vithalachi Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला विठ्ठलाची आरती संग्रह | Vithalachi Aarti Sangrah ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box