महात्मा जोतिबा फुले भाषण, माहिती | Mahatma Phule | Mahatma Jyotiba Phule Speech Mahiti - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 21, 2023

महात्मा जोतिबा फुले भाषण, माहिती | Mahatma Phule | Mahatma Jyotiba Phule Speech Mahiti

महात्मा जोतिबा फुले

Mahatma Jyotiba Phule

महात्मा जोतिबा फुले भाषण, माहिती | Mahatma Phule | Mahatma Jyotiba Phule Speech Mahiti

महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule)

          महात्मा फुले (Mahatma Phule) या विषयावर आपल्याला बऱ्याचदा माहिती लागते. महात्मा फुले यांच्या जयंती, पुण्यतिथी किंवा वक्तृत्व स्पर्धा यासाठी आपल्याला महात्मा फुले भाषण (Mahatma Phule Speech), महात्मा फुले माहिती (Mahatma Phule Mahiti) महात्मा फुले निबंध (Mahatma Phule Essay) आवश्यक असते. यासाठीच खास तुम्हाला आवश्यक व उपयोगी अशी माहिती येथे उपलब्ध करून दिली आहे. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा करतो.

जोतीराव गोविंदराव फुले (जन्म - ११ एप्रिल १८२७, मृत्यू - २८ नोव्हेंबर १८९०) :-

          महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule) हे थोर विचारवंत, समाजसुधारक आणि उत्कृष्ट लेखक होते. त्यांनी शेतकरी तसेच बहुजन समाजांच्या समस्यांना विशेष लक्षात ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची सुरवात केली. लोकांसाठी त्यांनी इतके केले की त्यांना इ.स.१८९० साली महात्मा ही उपाधी बहाल केली होती. आशा या महान मानवाची माहिती आज आपण या लेखातून बघणार आहोत.

"विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।"

          ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी गोविंदराव फुलेंच्या पत्नी चिमणाबाई फुलेंच्या पोटी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला त्याचे नाव ज्योतिराव असे ठेवण्यात आले. त्यांनी आपल्या नावाप्रमाने शिक्षणाची ज्योत पेटवून ज्ञान रुपी प्रकाश सर्वत्र पोहचवला. फुले हे त्यांचे मूळ आडनाव नसून गोर्‍हे होते परंतु महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव आणि दोन चुलते फुले विकण्याचे काम करीत असल्यामुळे पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. काही कारणास्तव फुले परिवाराला कटगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे यावे लागले. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.


          महात्मा फुले (Mahatma Phule) यांचा विवाह लहान वयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी करण्यात आला. त्यांना प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय करावा लागला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महात्मा फुलेंची बौद्धिक क्षमता चांगली असल्याने त्यांनी तो अभ्यासक्रम पाच ते सहा वर्षातच पूर्ण केला.


          महात्मा फुले (Mahatma Phule) याना समाज कार्याची फार आवड होती. समाजात असलेले अज्ञान आणि दारिद्रय पाहून त्यांना खूप दुःख होत असे. तिथे असलेल्या या समाजातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे त्यांनी निश्चय केला. परिस्थितीत बदल करण्याची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरातूनच केली त्यांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून केली. त्याठिकाणी शिक्षिकेची जबाबदारी त्यांची त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने त्यांनी मुहूर्तमेढ ठरली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. तसेच इ.स.१८५२ मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. परंतु कोणतेही चांगले काम लोकांना पटत नाही तसेच त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. समाज सुधारण्याच्या कार्याला त्यांनी गती दिली.


          महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी इ.स. १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापणा करुन याची संपुर्ण जबाबदारी सावित्रीबाईंकडे दिली. इ.स. १८६४ साली महात्मा फुलेंनी पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. यानंतर अनेकांनी विधवा महिलांसाठी आवाज उठवयाला सुरुवात केली. इ.स. १८६८ साली महात्मा फुलेंनी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला. महात्मा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील गुलामगिरी, जातीप्रथा नष्ट करुन सर्व समाजांना समान अधिकार मिळावे असा त्यांचा उद्देश होता.


          महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी इ.स. १८७९ पहिल्यांदाच रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. तसेच २ मार्च १८८२ रोजी महात्मा फुलेंनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिला. यात त्यांनी सर्व समाजातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी केली. हाच विचार करुन पुढे शाहू महाराजांनी याची अंमलबजावणी केली. इ.स. १८८३ साली महात्मा फुलेंनी शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ लिहला. आजही हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यासाठी महत्वाचा मानला जातो. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहला आणि शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिली.


          भारत देशाच्या समाजसुधारणेच्या चळवळीत महात्मा फुले यांचे कार्य फार मोलाचे आहे. तसचे त्यांना प्रत्येक शेवट पर्यंत साथ सावित्रीबाईं. परंतु असे म्हणतात ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला नेमके तसेच झाले अशा या थोर विचारवंत आणि समाजसुधारकाची २८ नोव्हेंबर १८९० रोजी प्राणज्योत मावळली. अशा या महान मानवास माझा कोटी कोटी प्रणाम.


          महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्यावर लिहिलेल्या या लेखाचा तुम्हाला महात्मा फुले यांच्या जयंती, पुण्यतिथी, वक्तृत्व स्पर्धा यासाठी नक्कीच फायदा होईल त्यासाठी तुम्हाला महात्मा फुले भाषण (Mahatma Phule Speech), महात्मा फुले माहिती (Mahatma Phule Mahiti), महात्मा फुले निबंध (Mahatma Phule Essay) येथून घेता येईल.

हे पण वाचा :-  शिक्षक दिन


          तुम्हाला महात्मा जोतिबा फुले भाषण, माहिती  ( Mahatma Jyotiba Phule Speech Mahiti ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad