ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन | APJ Abdul Kalam Infomation in Marathi | Vachan Prerana Diwas | World Students' Day - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 15, 2023

ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन | APJ Abdul Kalam Infomation in Marathi | Vachan Prerana Diwas | World Students' Day

ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन

APJ Abdul Kalam Infomation in Marathi

Vachan Prerana Diwas

World Students' Day


ए.पी.जे. अब्दुल कलाम ( A P J Abdul Kalam ) अर्थात अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम , त्यांना जगभरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ, अभियंता आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणूनही पद भूषवले आहे. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन | APJ Abdul Kalam Infomation in Marathi | Vachan Prerana Diwas | World Students' Day

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ( Dr A P J Abdul Kalam ) नेहामी म्हणायचे की,

"जीवनात परिस्थिती कशीही असो,
जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार कराल,
तेव्हा तुम्ही ती नक्कीच पूर्ण कराल"

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम ( A.P.J Abdul Kalam ) यांचे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्याची व यशस्वी होण्याची प्रेरणा देतात.


डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच बालपण :-

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी मद्रास प्रांतातील ( तमिळनाडू राज्य ) पंबन बेटावरील रामेश्वरच्या तीर्थक्षेत्रात धनुषकोडी या गावी एका मच्छीमार कुटुंबात झाला होता. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तमिळ मुस्लिम होते. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचे वडील जैनुलाब्दीन मारकायर हे मच्छीमारांना बोट भाड्याने चावण्यास देत असते. तसेच ते स्थानिक मशिदीचे इमाम ही होते. त्यांची आईचे नाव आशिअम्मा असून त्या गृहिणी होत्या. कलाम यांच्या कुटुंबात चार भाऊ व एक बहिण असून ते सर्वात लहान होते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (A P J Abdul Kalam) यांनी वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त हे गुण घेतले तर आईकडून चांगल्या वर विश्‍वास ठेवायची आंतरिक शक्ती व दयाळू वृत्ती हे गुण मिळाले.

हे पण पहा :- विज्ञान दिन

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच शिक्षण :-

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (A P J Abdul Kalam) यांना वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना रामेश्वरमच्या पंचायतीच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांचे शिक्षक इयादुराई सोलोमन यांनी त्यांना सांगितले होते की तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तीन गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यावर प्रभुत्व मिळवले पाहिजे. १] तीव्र इच्छा २] विश्वास आणि ३] अपेक्षा.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (A P J Abdul Kalam) पाचवीच्या वर्गात शिकत असताना त्यांचे शिक्षक मुलांना पक्षी कसे उडतात याविषयी माहिती देत ​​होते, मात्र विद्यार्थ्यांना ते समजले नाही म्हणून शिक्षकानी त्यांना समुद्रकिनारी नेले व तेथे उडणारे पक्षी दाखवले आणि त्यांना चांगले समजावून सांगितले. हे पक्षी पाहिल्यानंतर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (A P J Abdul Kalam) यांनी मी भविष्यात लढाऊ वैमानिक होईल असे ठरवले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना शिक्षणाची व वाचनाची खूप आवड होती. परंतु घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना शिक्षण घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यासाठी त्यांना घरोघरी जाऊन वर्तमानपत्रे टाकावी लागत व त्यातून मिळालेल्या पैशातून ते शाळेची फी भरत असत. कलाम यांनी लहानपणी लढाऊ वैमानिक होण्याच स्वप्न काळानुरूप बदलले.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन | APJ Abdul Kalam Infomation in Marathi | Vachan Prerana Diwas | World Students' Day

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच कार्य :-

पदवीनंतर ते हॉवरक्राफ्ट प्रकल्पावर काम करण्यासाठी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत रुजू झाले. १९६२ मध्ये, ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सामील झाले तेथे त्यांनी अनेक उपग्रह प्रक्षेपण प्रकल्पांमध्ये यशस्वीपणे भूमिका बजावली. प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी भारताचे पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन SLV-3 तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे जुलै १९८२ मध्ये रोहिणी उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केला. असे १९६२ ते १९८२ या काळात त्यांनी या सशोधनाशी संबंधित अनेक पदे भूषवली.

डॉ अब्दुल कलाम यांनी २००२ साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत ९२२,८८४ मतांनी जिंकून त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून २५ जुलै २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत काम केले.

भारत सुरक्षित व्हावा या उद्देशाने त्यांनी पृथ्वी, अग्नी अशी क्षेपणास्त्रे दिली. त्यांनी देशाला तत्वज्ञानात स्वावलंबी बनवले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (A P J Abdul Kalam) यांनी परमाणू शक्तीच्या योगदानाबद्दल त्यांना  मिसाईल मॅन म्हटले जाते. भारत सरकारने त्यांचा १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक युगात देशाची सेवा केली. तसेच ते त्यांच्या साध्या वागणुकीसाठी देखील प्रसिद्ध होते.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे असे महान कार्य कदाचित देवाला देखील आवडत असावे म्हणून देवाने त्यांना २७ जुलै २०१५ रोजी आपल्याकडे बोलावून घेतले व त्यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु आजही ते त्यांच्या पुस्तकांच्या व शोधाच्या माध्यमातून आपल्यात जिवंत आहेत व सदैव तरुणांना मार्गदर्शन करतात.

हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार :-

1981: Padma Bhushan - Government of India

1990 : Padma Vibhushan - Government of India

1994 : Distinguished Fellow - Institute of Directors, India

1995 : Honorary Fellow - National Academy of Medical Sciences

1997 : Bharat Ratna - Government of India

1997 : Indira Gandhi Award for National Integration - Government of India

1998 : Veer Savarkar Award – Government of India

2000 : SASTRA Ramanujan Prize – Shanmugha Arts, Science, Technology & Research Academy, India

2007 : Honorary Doctorate of Science – University of Wolverhampton, UK

2007 : King Charles II Medal – UK,
 

2008 : Honorary Doctor of Engineering – Nanyang Technological University, Singapore

2009 : International von Kármán Wings Award – California Institute of Technology, USA

2009 : Hoover Medal – American Society of Mechanical Engineers, USA

2010 : Doctor of Engineering – University of Waterloo, Canada

2011 : IEEE Honorary Membership – Institute of Electrical and Electronics Engineers, USA

2012 : Honorary Doctor of Laws – Simon Fraser University, Canada

2013 : Von Braun Award – National Space Society, United States

2014 : Honorary Doctor of Science – University of Edinburgh, Scotland

2021 : India declared his birthday as World Students' Day



डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके :-

१) इंडिया – माय-ड्रीम

२) अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)

३) एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :

४) फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन

५) सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

६) टार्गेट ३ मिलियन (सहलेखक – सृजनपालसिंग)

८) ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).

९) उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)

१०) ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक – अरुण तिवारी)

११) टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)

१२) दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

१३) विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.

१४) परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक – व्ही. पोतराज, मराठी अनुवाद – अशोक पाध्ये)

१५) इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)

१६) ‘इंडिया २०२० - ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)


                तुम्हाला ए.पी.जे. अब्दुल कलाम माहिती - वाचन प्रेरणा दिन | APJ Abdul Kalam Infomation in Marathi | Vachan Prerana Diwas  ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad