खरच, स्री स्वतंत्र आहे का ?
Freedom of women
'स्री स्वातंत्र्य' हा शब्द जणू काही चुकीचा वाटतो. आजच्या युगात स्री स्वातंत्र झाली आहे. ती विचार मांडते नोकरी करते, खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात ती आज आत्मविश्वासाने काम करते. अगदी सरपंचापासून ते राष्ट्रपती पर्यंत पदे तिने हस्तगत केली असली तरी माझ्या मनात एकच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे खरच स्री स्वातंत्र्य आहे का?
आज कोणत्याही स्त्रीला विचारा तू स्वतंत्र आहे का ? तर कदाचित मनातून उत्तर येईल 'नाही' पण मीडिया समोर कुणासमोर ती व्यक्त होणार नाही ती ठामपणे सांगेल मी स्वतंत्र आहे.
भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आज क्वचित असे काही कुटुंब असतील की तिला बरोबरीचा दर्जा किवा तिचा दरारा, सर्वस्व असेल रामायणात ही अग्नि परीक्षा देणारी सीता होती महाभारतात कुंती होती द्रोपदी होती जीचे वस्त्र हरण होताना तिचा पती काही करू शकला नाही. राधा ने कृष्णा वर प्रेम केले पण लग्न मात्र रुक्मिणी शी केले. माझा सर्व स्त्रियांना एकच प्रश्न आहे ? खरंच तुम्ही स्वतंत्र आहात का ? आपल्या मनाला विचारा
बाहेर कुठे फिरायला जायचे असो किंवा नोकरीवर जायचं असो किंवा स्वतः ला दवाखान्यात जायचे असो ती आधी घरातल्या सर्वांचा विचार करते. मैत्रीनी सोबत असो किंवा हळदी कुंकु ला असो किंवा कोणत्या कार्यक्रमात असो तिचे लक्ष घड्याळाकडे असते, मनात एक भीती असते सर्व गोष्टी बरोबर होतील ना? वेळेवर होतील ना?
कदाचित माझ्या या लेखावर आक्षेप घेणा रे बरेच पुरुष पुढे येतील पण कौतुक करणारा एकदा पुरुष असेल का? कदाचित एखाद्या स्त्रीचे सौंदर्याने घायाळ होऊन लाळ घोटणारे पुरुष करतील ही कौतुक पण खरचं या मुळे खरचं का स्री स्वतंत्र होणार आहे?
कदाचित सर्व पुरुषानाही प्रश्न पडला असेल की, नक्की यांना म्हणायचं आहे तरी काय? तर तमाम पुरुष बांधवांना मला हेच सांगायचं आहे की, जेव्हा माझा हा लेख वाचून झाल्यानंतर आपली आई ,बहीण, बायको हिला नक्की हा प्रश्न विचारा, तू स्वतंत्र आहेस का? त्याच्याकडून आलेल्या उत्तरा मधूनच आपण सर्वांना समजेल की मला काय म्हनयचे आहे? पण हा लेख वाचल्यानंतर पण हा प्रश्न विचरण्याची हिम्म त जर तुमची होत नसेल तर माझा प्रश्न अजूनही तसाच राहील.
खरच, स्री स्वतंत्र आहे का ?
तुम्हाला खरच, स्री स्वतंत्र आहे का ? ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box