Gudi Padawa
गुढीपाडवा माहिती मराठी
गुढीपाडवा (Gudi Padwa) हा मराठी वर्षातील साजरा केला जाणारा पहिला सण आहे. गुढी म्हणजे विजय पताका. गुढी पाडवा ( Gudi Padawa ) सण आपल्या संस्कृतीतील महत्वाचा सण आहे. त्यामुळे गुढी पाडव्याची माहिती ( Gudi padwa information ) असणे गरजेचे आहे. या दिवशी सर्व लोक आपल्या नातेवाईक व प्रिय व्यक्तींना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ( Gudi Padwa Wishes ) देतात. या सणामागे नैसर्गिक तसेच धार्मिक कारणे आहेत. या दिवशी सर्व लोक आनंदात व उत्साहात असतात.
गुढी पाडवा का साजरा केला जातो? ( Gudi Padwa Information )
धार्मिक कारण म्हणजेच भगवान श्रीराम हे माता सीतेचा शोध घेण्यासाठी दक्षिणेत गेले तेव्हा तेथे बाली चे शासन होते व तो तेथील जनतेला फार त्रास देत असे तेव्हा प्रभू श्रीराम यांनी त्याचा वध केला आणि धर्माचा विजय केला. तेव्हा तेथील लोकांनी घरावर गुढी उभारुन त्यांचे स्वागत केले. तो दिवस म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणून या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो. अजून एक अशीही एक आख्यायिका आहे की वनवास संपवून रावणावर जेव्हा प्रभू श्रीराम यांनी विजय मिळवला व ते माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या बरोबर अयोध्येत परत आले. तेव्हा काही लोकांनी हा दुष्ट प्रवृत्तींवर मिळविलेला विजयच होता असे मानून. त्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या अशी गुढीपाडवा सणाबद्दल आख्यायिका आहे.
शिव व पार्वती यांचा विवाह याच दिवशी निच्छित झाला होता असे म्हटले जाते. तसेच कुंभाराचा मुलगा शालिवाहन यांनी मातीचे सैन्य करून त्यांच्यावर मंत्रोच्चार करून पाणी शिंपडले व ते सैन्य जिवंत केले आणि त्यांनी बलाढ्य अशा शत्रूंचा पराभव केला. तेव्हा पासून शालिवाहन शक सुरु झाले तो हाच दिवस होता. अजून महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी या दिवसापासून सूर्योदय व सूर्यास्त याचे मोजमाप करून दिवस, महिना आणि वर्ष यावरून 'पंचांग' रचले. अशी अतुलनीय पराक्रम आणि सोहळे याच दिवशी झाले म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो. आणि आपल्या संस्कृतीचा महत्वाचा सण म्हणून साजरा होऊ लागला.
गुडी पाडवा या सणाचे या दिवसाचे नैसर्गिक कारण म्हणजे य दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन होते. आणि सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असून चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो. म्हणूनच मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याच नाव हे “चैत्र” आहे असे म्हटले जाते. तसेच त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा देखील म्हटले जाते. या दिवसापासून नुकतीच थंडी संपून उन्हाची चाहूल लागते. नुकत्याच झालेल्या होळीच्या सणात आपण सर्व अमंगल, अशुभ ,पापी गोष्टींचे दहन करून रंगपंचमी चांगल्या सवई व विचाराच्या रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगवून टाका असे जणू सगळ्यांना सांगत असते. निसर्ग जणू बोलत असतो, की आता “जुने टाकून, नवे हिरवे शालू नेसून घ्या” त्यामुळे झाडांची पिवळी पाने गळत असतात आणि हिरवी नवीन पालवी फुटत असतात. आंब्याला देखील मोहरत आलेला असतो.
गुडी पाडवा कसा साजरा केला जातो ( पूजा विधी ) (Gudi Padwa 2023 Puja Vidhi)
गुडी पाडवा हा साडे तीन महूर्थापैकी एक पूर्ण महुर्थ मानला जातो. गुढी पाडवा हा सण आपल्या मराठी संस्कृतीच्या नवीन वर्षाची नवी सुरवात आहे. तसेच गुढीसाठी बांधला जाणारा बांबू त्यावर तांबडा कलश, नववारी साडी, आंब्याची डहाळी, साखरेची घाटी, कडू लिंबाची डाहळी, चाफ्याची फुलाची माळ एकत्र करून रेशमी धाग्यात बांधून ते कळसाला बांधली जाते. गुडी ची पूजा करून तीचे औक्षण करून ती घराच्या खांबाला उभारली जाते. गुढीला उभारल्या नंतर तिच्या भोवती रांगोळी काढली जाते तसेच घराच्या चौकटीला आंब्याचे तोरण बांधले जाते. घरातील सर्व मंडळी गुढीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून जेवण करतात. तसेच काही लोक ब्राम्हणाला बोलून पूजा देखील घालून घेतात. गुढी पाडवा हा सण सुख, समाधान, आनंद व मांगल्य यांचे प्रतीक असतो. संध्याकाळी मुहूर्त पाहून गुढीला नारळ फोडले जात आणि त्याच बरोबर घाटी व बतासा प्रसाद म्हणून दिले जाते. गुढी पाडवा हा नवीन वर्ष असल्याने तेव्हा बऱ्याच ठिकाणी online Sale चालू असतात जसे gudi padwa sale amazon, gudi padwa sale flipkart असे अनेक sale सुरु असतात.
गुढी पाडव्याची तारीख वे वेळ ( तिथी ) (Gudi Padwa 2023 Date & Time )
या वर्षी गुढी पाडवा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होण्याची दिनांक व वेळ.
दिनांक :- 21 मार्च 2023, वेळ :- रात्री 09.22 पासून
गुढी पाडवा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी समाप्त होण्याची दिनांक व वेळ.
दिनांक :- 22 मार्च 2023, वेळ :- संध्याकाळी 06:50 वाजता
गुढी पाडवा सणाची दिनांक आहे.
दिनांक :- 22 मार्च 2023, वार :- बुधवार
मराठी शक युग आहे :- १९४५ चा प्रारंभ
हे पण पहा :- मराठी बोधकथागुढीपाडव्याच्या शुभेच्छा | Gudi Padwa Wishes in Marathi
"हे मराठी नव वर्ष तुम्हाला
आनंद, सुख, समृद्धीचे जावो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"आयुष्य एक वीणा आणि सूर आहेत भावनांचे
गाऊया धुंद मग्न होऊन, संगीत हिंदू नववर्षाचे
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"समतेचे बांधू तोरण,
गुढीउभारू ऐक्याची!
स्वप्न आपुले साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी"
"उभारा गुढी सुखासमृद्धीची,
सुरवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नव आशेची."
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
"वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष,
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष,
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"
"कितीही दुःख आली तरी, नवी सुरूवात होतेच,
हाच घेऊनी संदेश आले आहे, नवचैतन्याचे नववर्ष,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू,
एकमेंकाना साह्य करू,
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
माझ्याकडून तुम्हा सोन्यासारख्या लोकांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
हे पण वाचा :- जागतिक आदिवासी दिन
"गुढीपाडव्याच्या अनेक कथा,
गुढी आहे विजयाची पताका,
वृक्ष सजतो चैत्र महिना,
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं,
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं,
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा,
गुडीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा, पाडव्याचा सण,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"सण आला दारी,
घेऊन शुभेच्छांची वारी,
तुम्हाला जाओ नववर्ष छान,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"आयुष्य एक वीणा आणि सूर आहेत भावनांचे,
गाऊया धुंद मग्न होऊन, संगीत हिंदू नववर्षाचे,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
"जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून,
पाहूया नववर्षाची वाट,
जे आणेल आनंदाची बहार,
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून लाख लाख हार्दिक शुभेच्छा…..!
Happy Gudi Padawa
तुम्हाला Gudi Padawa | गुढीपाडवा माहिती | Gudi Padwa Information | Gudi Padwa Wishes ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box