भारताचे राष्ट्रगीत जन गण मन | National Anthem of India Jan Gan Man - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 4, 2023

भारताचे राष्ट्रगीत जन गण मन | National Anthem of India Jan Gan Man

भारताचे राष्ट्रगीत जन गण मन

National Anthem of India Jan Gan Man

भारताचे राष्ट्रगीत जन गण मन | National Anthem of India Jan Gan Man

            भारताचे राष्ट्रगीत जन गण मन ( National Anthem of India Jan Gan Man ) हे नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत “भारतो भाग्यो बिधाता” या नावाने रचले होते. हे गीत त्यांनी भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. “भारतो भाग्यो बिधाता” या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला. राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो. जन गण मन हे गीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम सार्वजनिकपणे २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले होते.


            जन गण मन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे. ते कडव पुढील प्रमाणे आहे.

जन गण मन अधिनायक जय हे लिरिक्स

Jan Gan Man Adhinayak Lyrics

जन गण मन अधिनायक जय हे,
भारत भाग्य विधाता,
पंजाब सिंध गुजरात मराठा,
द्रविड़ उत्कल बंग,
विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधि तरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशीष मांगे,
गाहे तव जयगाथा।
जन गण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे।

जन गण मन गीताचा अर्थ

जन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!

पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।
पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.

विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग। 
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.

जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।
तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.


रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले जन गण मन हे पूर्ण गीत

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||


            जन गण मन या गीतात रवींद्रनाथ टागोर यांनी भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.

                तुम्हाला भारताचे राष्ट्रगीत जन गण मन | National Anthem of India Jan Gan Man ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad