भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती | Republic Day Speech in Marathi | Republic Day Information - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती | Republic Day Speech in Marathi | Republic Day Information

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती

Republic Day Speech in Marathi

Republic Day Information

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती | Republic Day Speech in Marathi | Republic Day Information

भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती | Republic Day Speech in Marathi | Republic Day Information  ) :-

            २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणून फार मोठ्या प्रमाणवर व तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा व महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. हा राष्ट्रीय सण असल्याने देशभरात सुट्टी देण्यात येते. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की, प्रजासत्ताक म्हणजे काय?, प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणजे काय?


प्रजासत्ताक म्हणजे काय?

प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणजे काय?

            प्रजासत्ताक म्हणजे थोडक्यात प्रजेच्या हाती ( प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष ) सत्ता असणे. अर्थात ज्या ठिकाणी देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने निवडला न जाता लोकांमार्फत (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुकांच्या मार्फत) निवडला जातो. आणि तेथील सर्व शासकीय कार्यालये व पदे ही देशाच्या सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव खुली असतात.  आणि हे सर्व अधिकार जनतेला ज्या दिवसापासून मिळाले त्या दिवसाला दरवर्षी प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणून साजरा करतात. जसे भारत देशात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणून  साजरा केला जातो.

हे पण पहा :- देशभक्ति गीत

            भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्ष राज्य केले त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर देशाचे शोषण तसेच आर्थिक लूट केली. असे म्हटले जाते की, पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत असे याचा अर्थ असा की पूर्वी भारतात अमाप संपती होती. परंतु ही सर्व संपती ब्रिटीशांनी इंग्लंडला लुटून नेली. भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताचा स्वातंत्र्य लढा भगतसिंग, सुकदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, चाफेकर बंधू इत्यादी क्रांतीकारक आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या या बलिदानामुळेच १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतू राज्यकारभार करण्यासाठी भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे ब्रिटिशांच्या १९३५ सालच्या कायद्यानुसारच चालत होते.


            भारताचा राज्यकारभार व्यवस्थित व सुरळीत चालवा यासाठी काही नियमांची आवश्यक होती. याकारणास्तव संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तिला 'संविधान सभा' असे नाव देण्यात आले. त्या समितीत २९९ सदस्य होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रप्रसाद यांना करण्यात आले तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना नेमण्यात आले. २६ जानेवारी १९४९ रोजी भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला. त्यानंतर कलमवार चर्चा झाल्या त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या असे करून संपूर्ण संविधान तयार होण्यास २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला. त्या संविधानास संविधान सभेने मान्यता दिल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी त्याचा स्विकार करण्यात आला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. परंतु हे संविधान २६ जानेवारी १९५० पासून आमलात आणण्यात आले. भारतने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असल्याने २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो.

हे पण पहा :- क्रांती दिन

            प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) हा भारतात सर्वत्र उत्सहात साजरा केला जातो. भारताची राजधानी नवी दिल्लीतील राजपथ येथे साजरा केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनी खास परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याचीही प्रथा आहे. सकाळी ध्वजारोहण करून पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात. राजपथावरील अमर जवान ज्योतीवर पंतप्रधानांनी पुष्प अर्पण केल्यानंतर परेडला सुरुवात होते. यात भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंटचा सहभाग असतो. यानंतरच्या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेउन आपल्या राज्यातील विविध सांस्कृतिक आणि पारंपारिक झाकी काढत वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. राजधानी दिल्ली प्रमानेचे भारतातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून सरकारी तसेच खाजगी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन( Republic Day ) साजरा होतो. सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. तसेच प्रभात फेऱ्या, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविनार्यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. 


            शाळांमध्ये शाळेला तोरणे पताके चीपाकवले जातात, शाळेसमोर ध्वजाजवळ रांगोळी काढली जाते, गावात प्रभात फेरी काढली जाते, प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा दिल्या जातात, ध्वजारोहण केले जाते, ध्वजगीत व राष्ट्रगीत म्हटले जाते, भाषणे होतात, काही मनोरंजक कार्यक्रम घेतले जातात, स्काऊट-गाईड च्या विद्यार्थायंचे संचालन घेतले जाते, सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. मुख्याध्यापकाकडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात आणि शेवटी शाळांतून मुलांना खाऊ वाटला जातो.


            २६ जानेवारी 'प्रजासत्तक दिन' ( 26 January Republic Day) साजरा करण्यामागचा उद्देश एवढाच की, आपण आज स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या दडपशाही व गैरवर्तनाविरूद्ध आवाज उठवू शकतो तर केवळ आपल्या देशातील राज्यघटना व लोकशाही प्रवृत्तीमुळेच हे शक्य आहे. यामुळे आपण आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे व घटनेचे खूप मोठे योगदान आहे हे कदापि विसरून चालणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व संविधानाची निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण २६ जानेवारी 'प्रजासत्तक दिन' ( 26 January Republic Day) हा राष्ट्रीय सण साजरा करतो.

जय हिंद , जय भारत , जय महाराष्ट्र

            वरील दिलेल्या लेखातून तुम्हाला खालील मुद्यांची माहिती मिळवण्यास नक्कीच मदत होईल अशी अशा करतो.

  • प्रजासत्ताक दिन निबंध मराठी ( Republic Day Essay Marathi )
  • प्रजासत्ताक दिन विषयी माहिती मराठी ( Republic Day Information in Marathi )
  • प्रजासत्ताक दिनाचे भाषण मराठी ( Republic day speech in Marathi )
  • प्रजासत्ताक म्हणजे काय? ( What is a republic? )
  • प्रजासत्ताक म्हणजे दिन म्हणजे काय? ( What is Republic Day? )


          तुम्हाला  भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती | Republic Day Speech in Marathi | Republic Day Information in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad