रविवार सुट्टीचा इतिहास | Sunday holiday History | weekly holiday - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 24, 2023

रविवार सुट्टीचा इतिहास | Sunday holiday History | weekly holiday

रविवार सुट्टीचा इतिहास

Sunday holiday History

Weekly holiday

रविवार सुट्टीचा इतिहास ( Sunday holiday History ) किंवा रविवारी साप्ताहिक सुट्टी ( weekly holiday )  का दिली गेली त्यासाठी कोणी, केव्हा व कसे प्रयत्न केले याविषयी आपण लेखात माहिती पहाणार आहोत.
रविवार सुट्टीचा इतिहास | Sunday holiday History | weekly holiday
          रविवार सुट्टी ( Sunday Holiday | Weekly Holiday ) म्हटल म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. विशेष करून शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच तर गाणे म्हटले जातेना "रविवार माझ्या आवडीचा". आपल्याला रविवार या दिवशी हक्काची साप्ताहिक सुट्टी ( weekly holiday ) असते. परंतु तुम्हाला माहित आहे का? आपल्याला ही रविवारची साप्ताहिक सुट्टी ( sunday weekly holiday ) केव्हा, कशी आणि कोणी मिळवून दिली. चला तर मग बघू


          १८ व्या शतकात भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्यांनी आपल्यावर १५० वर्ष राज्य केले व भारतीयांना गुलुमासारखे वागवत. त्यांच्याकडून कष्ट तर फार करून घेत वरून मोबदला कमी देत तसेच सुट्टीही देत नसत. अशा कठीण काळात देखील नारायण मेघाची लोखंडे या मराठी माणसाने आपल्याला साप्ताहिक सुट्टी ( weekly holiday ) मिळावी म्हणून तब्बल ६ वर्षे संघर्ष केला तेव्हा कोठे आपल्याला ही साप्ताहिक सुट्टी ( weekly holiday ) मिळाली आहे. या साप्ताहिक सुट्टीची सुरवात भारत १० जून १८९० रोजी करण्यात आली.

हे पण पहा :- वाचनाचे फायदे

          इ.स. १८८१ साली भारतात मध्ये फॅक्टरी अॅक्ट लागू झाला होता. फॅक्टरी अॅक्ट कायद्यामुळे बालकामगारांच किमान वय हे ७ वर्ष असावे व त्यांचे कामाचे किमान तास ९ इतके असेतील असे ठरवण्यात आले. तसेच त्यात आठवड्याच्या सुट्टीचीही तरतूद करण्यात आली. परंतु त्यामध्ये महिला आणि प्रौढ कामागारांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नव्हती. म्हणून या फॅक्टरी ऍक्ट च्याविरोधात नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या मराठी माणसाने आवाज उठवला. 


          भारतात पहिल्या सुट्या अशा नव्हत्या. परंतु पूर्वी शनिवारी तेल आणू नये आणि सोमवारी कटिंग करू नये असे मानले जात होते. या मान्यतेनुसार रविवार हा दिवस सुट्टीचा दिवस ठरला. नारायण लोखंडे यांनी या प्रकरणात आंदोलन सुरूच ठेवले. त्यासाठी त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना 'बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशन'ची मुंबई येथे १८८४ साली स्थापना केली. व त्यातून त्यांनी ५ प्रमुख मागण्या इंग्रज सरकार पुढे ठेवल्या. फॅक्टीरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचं निवेदन दिलं. तेव्हा १० हजार कामगारांच्या साथीने २४ एप्रिल १८९० रोजी महालक्ष्मी रेसकोर्स वर सभा घेतली. आणि आंदोलन यशस्वी झाले तेव्हा १० जून १८९० रोजी 'रविवार' ही पहिली साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली.


            तुम्हाला रविवार सुट्टीचा इतिहास | Sunday holiday History | weekly holiday ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad