स्वच्छतेची शपथ
Oath of Cleanliness
Swachhatechi Shapat
राष्ट्रसंत गाडगेबाबा व राष्ट्रपिता महात्मा गांधीनी यांची स्वच्छतेची तळमळ तसेच त्यांनी पाहिलेले स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न आज आपल्याला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी प्राप्त झाली आहे. जसे महात्मा गांधींनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले तसच आपण आज भारतमातेला अस्वच्छतेतून मुक्त करूया व देशाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडूया त्यासाठी आपण आज शपथ घेऊ.
स्वच्छतेची शपथ
मी शपथ घेतो की, मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहिल आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातुन २ तास करुन स्वच्छतेच्या या संकल्पाला पुर्ण करीन.
मी स्वतः घाण करणार नाही , आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम मी स्वतः पासुन, माझ्या कुटुंबापासुन, माझ्या गल्ली/ वस्तीपासुन, माझ्या गावापासुन तसेच माझ्या कार्यस्थळापासुन या कामास सुरवात करेन.
मला हे मान्य आहे, कि जगामधिल जे देश स्वच्छ आहे. त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरीक स्वतः घाण करीत नाही व घाण करून देत नाहीत या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन.
मी आज जी शपथ घेत आहे. ति आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावेल. तेही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन. मला माहित आहे की, स्वच्छतेच्या दिशेन टाकलेले माझे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
जय हिंद, जय भारत
हे पण पहा :- भारताचे संविधान
तुम्हाला स्वच्छतेची शपथ | Oath of Cleanliness | Swachhatechi Shapat ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box