जागतिक ओझोन दिन माहिती | World Ozone Day Information in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 20, 2023

जागतिक ओझोन दिन माहिती | World Ozone Day Information in Marathi

जागतिक ओझोन दिन

World Ozone Day Information in Marathi

१६ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक ओझोन दिन | World Ozone Day म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी आज आपण येथे माहिती पहाणार आहोत.

जागतिक ओझोन दिन | World Ozone Day Speech

जागतिक ओझोन दिन माहिती | World Ozone Day Information in Marathi :-

          ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू होय. 1987 साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. १६ सप्टेंबर १९८७ रोजी हा करार झाला, तो 'मॉन्ट्रिअल करार' म्हणून ओळखला जातो. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत. ओझोनचं महत्त्व लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघटनेने १६ सप्टेंबर १९८७ मध्ये ठराव करून १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ’जागतिक ओझोन दिन’ म्हणून साजरा केला जातो.

          ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O³ असे लिहितात. ग्रीक भाषेतील वास घेणे याअर्थी असलेल्या “ओझेइन” या शब्दापासून 'ओझोन' शब्द तयार झाला आहे. ओझोन हा प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, तर 16 मजल्यांपर्यंतच वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय. १७ ते ५० व्या मजल्यांपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर. आणि एकूण प्रमाणाच्या १०% ओझोन तपांबरात तर उरलेला ९०% ओझोन स्थितांबरात आढळतो.


          ’ओझोन’ वायूविषयी मागील २५-३० वर्षांत बरीच जागृती झाली आहे. रोजच्या वापरातल्या रासायनिक गोष्टीं, फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. पृथ्वीभोवती असलेले 'ओझोन'चे नैसर्गिक कवच कमकुवत होते.


          अल्ट्राव्हायोलेट किरण आपल्याला हानिकारक असून उन्हाने कातडी रापली जाणे किंवा काळी पडणे याचाच अर्थ आपल्याला अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग झाला आहे असा होतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या उत्सर्गामुळे आपल्या त्वचेची आणि पेशींची हानी होऊन त्याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होते. या रोगाची लक्षणे लगेचच दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !


          आपण काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी जेव्हा शक्य असेल तेव्हा ओझोनला हानिकारक अशी उत्पादने वापरू नका. म्हणजेच स्प्रे, अग्निप्रतिबंधक उपकरणे, शीतकपाटे. उत्पादनावरील लेबल तपासून ओझोन थराचे हित जपणारी उत्पादने निवडावीत. ओझोन थराला उपद्रवकारक अशी रसायने असलेली उत्पादने नष्ट करताना किंवा दुरुस्त करताना ओडीएस हाताळू शकणार्‍या प्रमाणपत्रधारित तंत्रज्ञांकडेच गेलं पाहिजे. 


          तुम्हाला जागतिक ओझोन दिन माहिती | World Ozone Day Information in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad