१ नोव्हेंबर दिनविशेष | 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

१ नोव्हेंबर दिनविशेष | 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi

१ नोव्हेंबर दिनविशेष

1 November Dinvishesh

1 November day special in Marathi

१ नोव्हेंबर दिनविशेष | 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi

            १ नोव्हेंबर दिनविशेष ( 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ नोव्हेंबर दिनविशेष ( 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ नोव्हेंबर दिनविशेष

1 November Dinvishesh

1 November day special in Marathi


[१६८३]=> छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

[१७५५]=> भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.

[१८४५]=> मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

[१८४८]=> महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

[१८७०]=> अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

[१८७३]=> बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

[१८८८]=> चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

[१८९३]=> शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म.

[१८९६]=> नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

[१९१८]=> विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म.

[१९२५]=> गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

[१९२६]=> संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.

[१९२८]=> हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.

[१९३२]=> कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

[१९४०]=> भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

[१९४५]=> ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९४५]=> महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.

[१९५०]=> जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन.

[१९५६]=> आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

[१९५६]=> कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

[१९५६]=> केरळ राज्य स्थापना दिन.

[१९५६]=> दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

[१९५६]=> द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

[१९५६]=> भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.

[१९६०]=> अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

[१९६३]=> भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

[१९६६]=> पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

[१९६८]=> मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.

[१९७३]=> अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.

[१९७३]=> मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.

[१९७३]=> लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

[१९७४]=> क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.

[१९८२]=> अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.

[१९८८]=> ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

[१९९१]=> संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

[१९९३]=> औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.

[१९९३]=> ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

[१९९४]=> मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

[१९९४]=> शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

[१९९६]=> श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन.

[१९९९]=> कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

[२०००]=> सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[२००५]=> योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२००५]=> लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन.

[२००७]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.



            तुम्हाला १ नोव्हेंबर दिनविशेष | 1 November Dinvishesh | 1 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad