१३ नोव्हेंबर दिनविशेष
13 November Dinvishesh
13 November day special in Marathi
१३ नोव्हेंबर दिनविशेष ( 13 November Dinvishesh | 13 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १३ नोव्हेंबर दिनविशेष ( 13 November Dinvishesh | 13 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१३ नोव्हेंबर दिनविशेष
13 November Dinvishesh
13 November day special in Marathi
[१७४०]=> प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन.
[१७८०]=> शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म.
[१८४१]=> जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
[१८५०]=> इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म.
[१८५५]=> आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म.
[१८६४]=> ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
[१८७३]=> कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म.
[१८९८]=> पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म.
[१९१३]=> रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
[१९१७]=> महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म.
[१९१७]=> हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म.
[१९२१]=> वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
[१९३१]=> शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
[१९४७]=> सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
[१९५४]=> सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.
[१९५६]=> शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन.
[१९६७]=> अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म.
[१९७०]=> बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
[१९९४]=> स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
[२००१]=> ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन.
[२००२]=> नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.
[२०१२]=> ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
तुम्हाला १३ नोव्हेंबर दिनविशेष | 13 November Dinvishesh | 13 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box