१४ नोव्हेंबर दिनविशेष
14 November Dinvishesh
14 November day special in Marathi
१४ नोव्हेंबर दिनविशेष ( 14 November Dinvishesh | 14 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १४ नोव्हेंबर दिनविशेष ( 14 November Dinvishesh | 14 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१४ नोव्हेंबर दिनविशेष
14 November Dinvishesh
14 November day special in Marathi
[१६५०]=> इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म.
[१७१९]=> ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म.
[१७६५]=> वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म.
[१७७०]=> जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
[१८६३]=> अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म.
[१८८१]=> पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म.
[१८८९]=> भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
[१९०४]=> इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म.
[१९१५]=> अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन.
[१९१८]=> चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म.
[१९१९]=> स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म.
[१९२२]=> ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
[१९२२]=> संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.
[१९२४]=> कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म.
[१९३५]=> जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म.
[१९४०]=> दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
[१९४७]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म.
[१९६७]=> क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन.
[१९६९]=> जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
[१९७१]=> ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.
[१९७१]=> कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन.
[१९७१]=> भारतीय शेफ आणि लेखक विकास खन्ना यांचा जन्म.
[१९७१]=> मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
[१९७४]=> क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.
[१९७५]=> स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.
[१९७७]=> हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन.
[१९९१]=> जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
[१९९३]=> स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन.
[२०००]=> गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन.
[२०१३]=> सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
[२०१५]=> भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.
हे पण पहा :- घरदर्शक शब्द
तुम्हाला १४ नोव्हेंबर दिनविशेष | 14 November Dinvishesh | 14 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
[१६५०]=> इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म.
हे पण पहा :- घरदर्शक शब्द
तुम्हाला १४ नोव्हेंबर दिनविशेष | 14 November Dinvishesh | 14 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box