१८ नोव्हेंबर दिनविशेष | 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 18, 2023

१८ नोव्हेंबर दिनविशेष | 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi

१८ नोव्हेंबर दिनविशेष

18 November Dinvishesh

18 November day special in Marathi

१८ नोव्हेंबर दिनविशेष | 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi

            १८ नोव्हेंबर दिनविशेष ( 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ नोव्हेंबर दिनविशेष ( 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ नोव्हेंबर दिनविशेष

18 November Dinvishesh

18 November day special in Marathi


[१४९३]=> ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

[१७७२]=> मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन.

[१८०९]=> फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

[१८३०]=> इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन.

[१८८२]=> अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

[१८९८]=> भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

[१९०१]=> चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म.

[१९०५]=> लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

[१९०६]=> मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म.

[१९०९]=> कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म.

[१९१०]=> क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म.

[१९१८]=> लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

[१९२८]=> वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

[१९३१]=> हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

[१९३३]=> प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

[१९३६]=> भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन.

[१९४५]=> श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

[१९५५]=> भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

[१९६२]=> अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन.

[१९६२]=> डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

[१९६३]=> पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

[१९९२]=> ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९९३]=> दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

[१९९३]=> लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

[१९९६]=> समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे 
आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

[१९९८]=> भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन.

[१९९८]=> सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

[१९९९]=> स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

[२००१]=> नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

[२००६]=> मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

[२०१५]=> टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला

[२०१५]=> भारतीय महिला दुहेरी शटलर जोडी ज्वाला व अश्विनी यांचा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव.

[२०१५]=> भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांत ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या तियान हुवेई ने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

[२०१५]=> भारतीय शटलर जयराम चा काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत चीनच्या चेन लोंग ने पहिल्याच फेरीत पराभूत केले

[२०१५]=> भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

[२०१५]=> भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.


हे पण पहा :- समूह दर्शक शब्द

            तुम्हाला १८ नोव्हेंबर दिनविशेष | 18 November Dinvishesh | 18 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad