२ नोव्हेंबर दिनविशेष | 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 2, 2023

२ नोव्हेंबर दिनविशेष | 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi

२ नोव्हेंबर दिनविशेष

2 November Dinvishesh

2 November day special in Marathi

२ नोव्हेंबर दिनविशेष | 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi

            २ नोव्हेंबर दिनविशेष ( 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ नोव्हेंबर दिनविशेष ( 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ नोव्हेंबर दिनविशेष

2 November Dinvishesh

2 November day special in Marathi


[१९१४]=> रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९३६]=> ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

[१९३६]=> कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.

[१९४०]=> दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.

[१९५३]=> पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.

[१९९९]=> दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.

[१४७०]=> इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)

[१७५५]=> फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म

[१८३३]=> होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म

[१८८२]=> महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म.

[१८८६]=> बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म.

[१८९७]=> दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म.

[१९२१]=> ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.

[१९२९]=> बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म.

[१९४१]=> केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.

[१९६०]=> संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.

[१९६५]=> अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

[१८८५]=> मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर यांचे निधन.

[१९५०]=> नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन.

[१९५४]=> ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.

[१९८४]=> मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.

[१९९०]=> गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन.

[२०१२]=> तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन

[२०१२]=> भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन.



            तुम्हाला २ नोव्हेंबर दिनविशेष | 2 November Dinvishesh | 2 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad