२० नोव्हेंबर दिनविशेष | 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 20, 2023

२० नोव्हेंबर दिनविशेष | 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi

२० नोव्हेंबर दिनविशेष

20 November Dinvishesh

20 November day special in Marathi

२० नोव्हेंबर दिनविशेष | 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi

            २० नोव्हेंबर दिनविशेष ( 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० नोव्हेंबर दिनविशेष ( 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० नोव्हेंबर दिनविशेष

20 November Dinvishesh

20 November day special in Marathi


[१६०२]=>
जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ऑट्टो फोन ग्वेरिक यांचा जन्म.

[१७५०]=> म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म.

[१७८९]=> न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

[१८५४]=> कवी, निबंधकार व नाटकाकर मोरो गणेश लोंढे यांचा जन्म.

[१८५९]=> स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन.

[१८७७]=> थाॅमस अल्वा एडिसन यांनो ग्रामोफोन चा शोध लावला.

[१८८४]=> लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन.

[१८८९]=> अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचा जन्म.

[१८९२]=> इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म.

[१९०५]=> संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म.

[१९०८]=> बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.

[१९१०]=> डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

[१९१०]=> रशियन साहित्यिक लिओ टॉलस्टॉय यांचे निधन.

[१९१७]=> युक्रेन प्रजासत्ताक बनले.

[१९२४]=> फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

[१९२७]=> न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

[१९३९]=> साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म.

[१९४१]=> उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

[१९४५]=> न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

[१९५४]=> सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन.

[१९५९]=> युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

[१९६३]=> इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

[१९६९]=> अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांचा जन्म.

[१९७०]=> ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन.

[१९७३]=> पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन.

[१९८५]=> मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.

[१९८९]=> किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन.

[१९९४]=> भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

[१९९७]=> अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

[१९९७]=> स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

[१९९८]=> आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

[१९९८]=> संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी यांचे निधन.

[१९९९]=> अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.

[१९९९]=> आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

[१९९९]=> तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर यांचे निधन.

[२००३]=> सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन.

[२००७]=> रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन.

[२००८]=> अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.


हे पण पहा :- नाते संबंध 

            तुम्हाला २० नोव्हेंबर दिनविशेष | 20 November Dinvishesh | 20 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad