२२ नोव्हेंबर दिनविशेष | 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 22, 2023

२२ नोव्हेंबर दिनविशेष | 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi

२२ नोव्हेंबर दिनविशेष

22 November Dinvishesh

22 November day special in Marathi

२२ नोव्हेंबर दिनविशेष | 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi

            २२ नोव्हेंबर दिनविशेष ( 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ नोव्हेंबर दिनविशेष ( 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ नोव्हेंबर दिनविशेष

22 November Dinvishesh

22 November day special in Marathi


[१८०८]=> पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म.

[१८५७]=> कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

[१८७७]=> एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म.

[१८८०]=> धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म.

[१८८५]=> पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म.

[१८९०]=> फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म.

[१९०२]=> जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन.

[१९०९]=> स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.

[१९१३]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म.

[१९१५]=> चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म.

[१९२०]=> कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

[१९२२]=> साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

[१९२६]=> मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म.

[१९३९]=> उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.

[१९४३]=> अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

[१९४३]=> लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

[१९४४]=> खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

[१९४८]=> मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

[१९५६]=> ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

[१९५७]=> नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन.

[१९६३]=> अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

[१९६३]=> अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

[१९६३]=> इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन.

[१९६३]=> थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

[१९६५]=> संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

[१९६७]=> टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

[१९६८]=> द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

[१९६८]=> पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

[१९७०]=> श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

[१९८०]=> नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

[१९८०]=> हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन.

[१९८६]=> भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.

[१९९१]=> डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.

[१९९७]=> नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.

[२०००]=> अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन.

[२००२]=> हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

[२००५]=> अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

[२००८]=> गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन.

[२०१२]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन.

[२०१३]=> भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

[२०१६]=> भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन.


हे पण पहा :- स्वर संधी

            तुम्हाला २२ नोव्हेंबर दिनविशेष | 22 November Dinvishesh | 22 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad