२७ नोव्हेंबर दिनविशेष | 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 27, 2023

२७ नोव्हेंबर दिनविशेष | 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi

२७ नोव्हेंबर दिनविशेष

27 November Dinvishesh

27 November day special in Marathi

२७ नोव्हेंबर दिनविशेष | 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi

            २७ नोव्हेंबर दिनविशेष ( 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २७ नोव्हेंबर दिनविशेष ( 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२७ नोव्हेंबर दिनविशेष

27 November Dinvishesh

27 November day special in Marathi


[१७०१]=> स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अँडर्स सेल्सियस यांचा जन्म.

[१७५४]=> फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचे निधन.

[१८१५]=> पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

[१८३९]=> बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

[१८५७]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म.

[१८७०]=> इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

[१८७१]=> इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.

[१८७४]=> इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म.

[१८७८]=> भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म.

[१८८१]=> प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म.

[१८८८]=> भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

[१८९४]=> पॅनासोनिक चे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म.

[१९०३]=> नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

[१९०७]=> विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म.

[१९०९]=> रशियन गणितज्ञ अनातोली माल्त्सेव यांचा जन्म.

[१९१५]=> मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म.

[१९४०]=> अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन 
७० जण ठार झाले.

[१९५२]=> तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन.

[१९५२]=> भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

[१९६७]=> गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन.

[१९७५]=> गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन.

[१९७६]=> प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन.

[१९७८]=> भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन.

[१९८६]=> भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

[१९९४]=> स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन.

[१९९५]=> गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

[१९९५]=> दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

[१९९५]=> पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

[२०००]=> साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन.

[२००२]=> भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन.

[२००७]=> गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन.

[२००८]=> भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन.

[२०१६]=> निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.


हे पण पहा :- हिंदी बोधकथा

            तुम्हाला २७ नोव्हेंबर दिनविशेष | 27 November Dinvishesh | 27 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad