४ नोव्हेंबर दिनविशेष | 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 4, 2023

४ नोव्हेंबर दिनविशेष | 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi

४ नोव्हेंबर दिनविशेष

4 November Dinvishesh

4 November day special in Marathi

४ नोव्हेंबर दिनविशेष | 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi

            ४ नोव्हेंबर दिनविशेष ( 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ४ नोव्हेंबर दिनविशेष ( 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

४ नोव्हेंबर दिनविशेष

4 November Dinvishesh

4 November day special in Marathi


[१६१८]=> मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म.

[१८४५]=> भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे जन्म.

[१८७१]=> मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

[१८८४]=> ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म.

[१८८४]=> प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म.

[१८९४]=> कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म.

[१८९६]=> पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.

[१८९७]=> भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म.

[१९१६]=> बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म.

[१९२१]=> जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.

[१९२२]=> तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.

[१९२५]=> चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म.

[१९२९]=> गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म.

[१९२९]=> शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म.

[१९३०]=> भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म.

[१९३४]=> दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

[१९३९]=> चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.

[१९४८]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

[१९५०]=> व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

[१९५५]=> भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

[१९७०]=> लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

[१९७१]=> अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

[१९८६]=> भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

[१९९१]=> प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन.

[१९९२]=> मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन.

[१९९५]=> इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन.

[१९९६]=> कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

[१९९८]=> हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

[१९९९]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन.

[२०००]=> हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.

[२००१]=> हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

[२००५]=> इतिहासकार, वृत्तपत्रकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

[२००८]=> बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

[२०११]=> नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.


            तुम्हाला  नोव्हेंबर दिनविशेष | 4 November Dinvishesh | 4 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad