६ नोव्हेंबर दिनविशेष
6 November Dinvishesh
6 November day special in Marathi
६ नोव्हेंबर दिनविशेष ( 6 November Dinvishesh | 6 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ६ नोव्हेंबर दिनविशेष ( 6 November Dinvishesh | 6 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
६ नोव्हेंबर दिनविशेष
6 November Dinvishesh
6 November day special in Marathi
[१७६१]=> मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.
[१८१४]=> सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अॅडोल्फ सॅक्स यांचा जन्म.
[१८३६]=> फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन.
[१८३९]=> प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.
[१८६०]=> अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
[१८६१]=> बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म.
[१८८०]=> निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म.
[१८८८]=> महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
[१८९०]=> कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म.
[१९०१]=> जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म.
[१९१२]=> भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
[१९१३]=> दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
[१९१५]=> चित्रपट कथाकार, दिगदर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म.
[१९२६]=> अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचा जन्म.
[१९२६]=> पत्रकार,कथाकार,कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा मुंबई येथे जन्म.
[१९५४]=> मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
[१९६८]=> याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.
[१९८५]=> प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन.
[१९८७]=> मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे निधन.
[१९९२]=> संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन.
[१९९६]=> अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
[१९९८]=> कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन.
[१९९९]=> विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
[२००१]=> संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[२००२]=> स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.
[२०१०]=> पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन.
[२०१२]=> बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
[२०१३]=> भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन.
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
तुम्हाला ६ नोव्हेंबर दिनविशेष | 6 November Dinvishesh | 6 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box