७ नोव्हेंबर दिनविशेष | 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 7, 2023

७ नोव्हेंबर दिनविशेष | 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi

७ नोव्हेंबर दिनविशेष

7 November Dinvishesh

7 November day special in Marathi

७ नोव्हेंबर दिनविशेष | 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi

             नोव्हेंबर दिनविशेष ( 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ नोव्हेंबर दिनविशेष ( 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ नोव्हेंबर दिनविशेष

7 November Dinvishesh

7 November day special in Marathi


[१५६२]=> मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन.

[१८२४]=> डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

[१८५८]=> लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म.

[१८६२]=> दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन.

[१८६७]=> नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म.

[१८६८]=> व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म.

[१८७५]=> सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

[१८७९]=> रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म.

[१८७९]=> वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

[१८८४]=> क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म.

[१८८८]=> नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म.

[१९००]=> स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचा जन्म.

[१९०३]=> शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म.

[१९०५]=> आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन.

[१९१५]=> महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

[१९१७]=> पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

[१९२३]=> भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन.

[१९३६]=> प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात रिलीज झाला.

[१९४४]=> फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

[१९४७]=> भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.

[१९५१]=> एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९५४]=> अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन यांचा जन्म.

[१९६०]=> भारतीय चित्रपट निर्माते श्यामप्रसाद यांचा जन्म.

[१९६३]=> मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन.

[१९७१]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक त्रिविक्रम श्रीनिवास यांचा जन्म.

[१९७५]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक वेंकट प्रभू यांचा जन्म.

[१९८०]=> भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.

[१९८०]=> हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन.

[१९८१]=> अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन.

[१९८१]=> भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.

[१९९०]=> मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

[१९९८]=> शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन.

[२०००]=> ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू सी.सुब्रह्मण्यम यांचे निधन.

[२००१]=> बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

[२००६]=> भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन.

[२००९]=> लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन.



            तुम्हाला ७ नोव्हेंबर दिनविशेष | 7 November Dinvishesh | 7 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad