८ नोव्हेंबर दिनविशेष | 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

८ नोव्हेंबर दिनविशेष | 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi

८ नोव्हेंबर दिनविशेष

8 November Dinvishesh

8 November day special in Marathi

८ नोव्हेंबर दिनविशेष | 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi

             नोव्हेंबर दिनविशेष ( 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ नोव्हेंबर दिनविशेष ( 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ नोव्हेंबर दिनविशेष

8 November Dinvishesh

8 November day special in Marathi


[१२२६]=> फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचे निधन.

[१६५६]=> खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे पहिले शास्रज्ञ.

[१६७४]=> कवी, विद्वान व मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचे निधन.

[१८३१]=> भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल रॉबर्ट बुलवेर-लिटन यांचा जन्म.

[१८६६]=> ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक हर्बर्ट ऑस्टिन यांचा जन्म.

[१८८९]=> मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

[१८९३]=> थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचा जन्म.

[१८९५]=> दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

[१९०९]=> स्वातंत्रसैनिक व पत्रकार नरुभाई लिमये यांचा जन्म.

[१९१७]=> कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म.

[१९१९]=> प्रसिद्ध लेखक, नाटककार, संगीतकार, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेते पुरूषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांचा जन्म.

[१९२०]=> भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म.

[१९२७]=> भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म.

[१९३२]=> अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना.

[१९३९]=> म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

[१९४७]=> पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

[१९५३]=> भारतीय राजकारणी नंद कुमार पटेल यांचा जन्म.

[१९६०]=> अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

[१९६०]=> भारतीय हवाई दलप्रमुख सुब्रतो मुखर्जी यांचे निधन.

[१९७०]=> मायस्पेस चे सहसंस्थापक टॉम एंडरसन यांचा जन्म.

[१९७४]=> नारुतो चे जनक मसाशी किशिमोतो यांचा जन्म.

[१९७६]=> ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली यांचा जन्म.

[१९८७]=> पुणे मॅरेथॉनचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन. पुणे मॅरेथॉन ही स्पर्धा खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरु केली.

[१९९६]=> कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड.

[२००२]=> जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०१३]=> भारतीय पत्रकार आणि अभिनेते अमांची वेक्कत सुब्रमण्यम यांचे निधन.

[२०१५]=> उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचे सुपुत्र तसेच कँपँरो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगद पॉल यांचे अपघाती निधन.

[२०१५]=> भारतीय एअर मर्शल ओमप्रकाश मेहरा यांचे निधन.

[२०१६]=> डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

[२०१६]=> तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या.



            तुम्हाला ८ नोव्हेंबर दिनविशेष | 8 November Dinvishesh | 8 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad