९ नोव्हेंबर दिनविशेष
9 November Dinvishesh
9 November day special in Marathi
९ नोव्हेंबर दिनविशेष ( 9 November Dinvishesh | 9 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ९ नोव्हेंबर दिनविशेष ( 9 November Dinvishesh | 9 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
९ नोव्हेंबर दिनविशेष
9 November Dinvishesh
9 November day special in Marathi
[१८०१]=> आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म.
[१८६७]=> जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म.
[१८७७]=> इटली प्रजास्ताक चे पहिले अध्यक्ष इरिको डी निकोला यांचा जन्म.
[१८७७]=> सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म.
[१९०४]=> सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म.
[१९०६]=> आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
[१९१८]=> तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म.
[१९२३]=> दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
[१९२४]=> ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्म.
[१९३१]=> लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्म.
[१९३४]=> अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचा जन्म.
[१९३७]=> जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
[१९४०]=> इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन.
[१९४४]=> भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म.
[१९४७]=> भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
[१९५२]=> इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचे निधन.
[१९५३]=> कंबोडियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
[१९६०]=> रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले.
[१९६२]=> भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांचे निधन.
[१९६५]=> इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
[१९६७]=> मराठी रंगभूमीचे खलनायक व चित्रपट अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे निधन.
[१९६७]=> रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
[१९७०]=> फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचे निधन.
[१९७७]=> सुप्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिगदर्शक व लेखक केशवराव भोळेे यांचे निधन.
[१९८०]=> अभिनेत्री व मॉडेल पायल रोहतगी यांचा जन्म.
[१९८८]=> मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
[१९९७]=> साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
[२०००]=> उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
[२०००]=> उत्तराखंड राज्याची निर्मिती.
[२०००]=> न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासो यांचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
[२०००]=> मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन.
[२००३]=> मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.
[२००५]=> भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.
[२०११]=> भारतीय-अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोविंद खुराना यांचे निधन.
हे पण पहा :- आलंकारिक शब्द
तुम्हाला ९ नोव्हेंबर दिनविशेष | 9 November Dinvishesh | 9 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box