भारताचे राष्ट्रपती | India president list | All President of India | Presidents of India List | List of Presidents of India | Bharatache Rashtrapati List - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 1, 2023

भारताचे राष्ट्रपती | India president list | All President of India | Presidents of India List | List of Presidents of India | Bharatache Rashtrapati List

भारताचे राष्ट्रपती

India president list

All President of India

Presidents of India List

List of Presidents of India

Bharatache Rashtrapati List


भारताचे राष्ट्रपती यादी | List of Presidents of India | Presidents of India List | Bharatache Rashtrapati List

भारताचे राष्ट्रपती | India president list | All President of India | Presidents of India List | List of Presidents of India | Bharatache Rashtrapati List :- 


राष्ट्रपतीचे महत्त्व ( Importance of the President )

  • राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असतो.
  • राष्ट्रपतीला कार्यकारी मंडळातील सर्वोच्च मानाचे स्थान असते.
  • ब्रिटिश राज्यघटनेनुसार राजास जे स्थान आहे, तेच स्थान भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींस आहे.
  • भारताच्या कार्यकारी मंडळाचे सर्व अधिकार राष्ट्रपतींच्या नावाने अमलात आणले जातात.
  • राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असले तरी त्यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच काम करावे असा संकेत आहे.


घटनात्मक कलम ( Constitutional Clause )

            भारतीय राज्यघटनेच्या कलम ५२ ते ६२ व कलम ७३ मध्ये राष्ट्रपतिविषयक तरतुदी दिलेल्या आहेत.

राष्ट्रपतींची निवड ( Election of the President )

            भारताच्या राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही गृहांतील निवडून आलेले सदस्य व राज्यांच्या विधिमंडळातील निवडून आलेले सदस्य यांच्याकडून होते. राज्य विधानसभा सदस्यांच्या व संसद सदस्यांच्या मतांचे मूल्य पुढीलप्रमाणे निर्धारित केले जाते-


संबंधित राज्याची लोकसंख्या         
-------------------------------- X ---------------
संबंधित राज्यातील निर्वाचित          १,०००
विधानसभा सदस्यांची संख्या

= संबंधित राज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य



सर्व राज्यांतील विधानसभांच्या
निर्वाचित सदस्यांच्या मतांची बेरीज
---------------------------------------------------------------
निर्वाचित संसद (लोकसभा व राज्यसभा) सदस्यांची संख्या

= संसदेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याच्या मताचे मूल्य

राष्ट्रपती पदासाठी पात्रता ( Qualifications of the President )

  • संबंधित उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण असावे.
  • ती व्यक्ती लोकसभेच्या निवडणुकीस पात्र असावी.
  • ती व्यक्ती शासनात कोणतेही फायद्याचे पद भूषवीत नसावी.
  • लोकसभेचा सभासद नसावा; असल्यास राष्ट्रपती म्हणून निवड होताच त्याचे सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते.

राष्ट्रपतीचे अधिकार ( Powers of the President )

  • प्रशासकीय अथवा कार्यकारी अधिकार
  • लष्करी अधिकार
  • विधीविषयक अधिकार
  • अध्यादेश काढण्याचा अधिकार
  • अर्थविषयक अधिकार
  • न्यायविषयक अधिकार
  • आणीबाणीविषयक अधिकार
    • राष्ट्रीय आणीबाणी
    • घटनात्मक आणीबाणी
    • आर्थिक आणीबाणी

राष्ट्रपती पदाची मुदत ( Presidential term )

  • राष्ट्रपतिपदाची मुदत पाच वर्षे इतकी असते.
  • राष्ट्रपतिपद एकदा भूषविल्यानंतरही पुन्हा राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविता येते.
  • राष्ट्रपतिपद किती वेळा भूषवावे, याबद्दल कोणतेही घटनात्मक बंधन नाही.


राष्ट्रपतीचे पद केव्हा संपुष्टात येते ? ( When does the office of the President end? )

  • राष्ट्रपतिपदाची मुदत संपल्यावर.
  • स्वतःच्या हस्ताक्षरांत उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केल्यास.
  • घटनेतील तरतुदींचा भंग केल्याच्या कारणासाठी, महाअभियोगाद्वारे (Impeachment) घटनेत विहित केलेल्या पद्धतीनुसार पदमुक्त केल्यास.

राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते ( Salary and Allowances of the President )

            सध्या राष्ट्रपतींचे वेतन दरमहा रुपये ५,००,०००/- अधिक भत्ते असे आहे. त्याशिवाय राष्ट्रपतींना निवास, प्रवास व इतर विशेष सोयी-सवलती उपलब्ध असतात. निवृत्तीनंतर त्यांना वार्षिक रुपये १,५०,०००/- इतके निवृत्तिवेतन मिळते. राष्ट्रपतींचे वेतन, निवृत्तिवेतन व भत्ते ठरविण्याचे अधिकार संसदेस आहेत.


राष्ट्रपतींना निवृत्तीनंतरचे फायदे ( Post-retirement benefits to the President )

  • राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर दरमहा १,५०,०००\- पेन्शन मिळते. 
  • कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी महिन्याला ६० हजार रुपये वेगळे दिले जातात.
  • आयुष्यभरासाठी एक मोफत बंगला (टाइप VIII) आहे.
  • दोन विनामूल्य लँडलाइन आणि एक मोबाइल फोन.
  • आजीवन ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवास आणि आयुष्यभर मोफत वाहन सुविधा.
  • सुरक्षा आणि दिल्ली पोलिसांचे २ सचिव.

            आपण येथे आता पर्यंत होऊन गेलेले भारताचे राष्ट्रपतीची यादी ( India president list | All President of India | Presidents of India List | List of Presidents of India | Bharatache Rashtrapati List ) येथे पहाणार आहोत.


भारताचे राष्ट्रपती यादी

क्रराष्ट्रपतीचे नावकार्यकाळ
डॉ. राजेंद्र प्रसाद
२६ जानेवारी १९५० ते
०३ मे १९६२
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
०३ मे १९६२ ते
०३ मे १९६७
डॉ. झाकीर हुसेन
०३ मे १९६७ ते
०३ मे १९६९
वराहगिरी वेंकट गिरी
( हंगामी )
०३ मे १९६९ ते
२० जुलै १९६९ 
मोहम्मद हिदायतुल्ला
( हंगामी )
२० जुलै १९६९ ते
२४ ऑगस्ट १९६९ 
वराहगिरी वेंकट गिरी
२४ ऑगस्ट १९६९ ते
२४ ऑगस्ट १९७४
फखरुद्दीन अली अहमद
२४ ऑगस्ट १९७४ ते
११ फेब्रुवारी १९७७
बसप्पा दानाप्पा जट्टी
 ( हंगामी )
११ फेब्रुवारी १९७७ ते
२५ जुलै १९७७
नीलम संजीव रेड्डी
२५ जुलै १९७७ ते
२५ जुलै १९८२
१०
ग्यानी झैल सिंग
२५ जुलै १९८२ ते
२५ जुलै १९८७
११
रामास्वामी व्यंकटरमण
२५ जुलै १९८७ ते
२५ जुलै १९९२
१२
शंकर दयाळ शर्मा
२५ जुलै १९९२ ते
२५ जुलै १९९७
१३
कोचेरिल रमण नारायणन
२५ जुलै १९९७ ते
२५ जुलै २००२
१४
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
२५ जुलै २००२ ते
२५ जुलै २००७
१५
प्रतिभा पाटील
२५ जुलै २००७ ते
२५ जुलै २०१२
१६
प्रणव मुखर्जी
२५ जुलै २०१२ ते
२५ जुलै २०१७
१७
श्री राम नाथ कोविंद
२५ जुलै २०१७ ते
२१ जुलै २०२२
१८
द्रौपदी मुर्मू
२१ जुलै २०२२ ते
आजपर्यंत.
१९पुढील राष्ट्रपती-

२०पुढील राष्ट्रपती-



भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

=> डॉ. राजेंद्र प्रसाद ( २६ जानेवारी १९५० ते ०३ मे १९६२ )

भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

=> द्रौपदी मुर्मू ( २१ जुलै २०२२ ते आजपर्यंत )


          तुम्हाला भारताचे राष्ट्रपती | India president list | All President of India | Presidents of India List | List of Presidents of India | Bharatache Rashtrapati List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad