१ डिसेंबर दिनविशेष
1 December Dinvishesh
1 December day special in Marathi
१ डिसेंबर दिनविशेष ( 1 December Dinvishesh | 1 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १ डिसेंबर दिनविशेष | 1 December Dinvishesh | 1 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१ डिसेंबर दिनविशेष
1 December Dinvishesh
1 December day special in Marathi
@ जागतिक एड्स दिन [ World AIDS Day ]
[१०८१]=> फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचा जन्म.
[११३५]=> इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.
[१७६१]=> मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा जन्म.
[१८३५]=> हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
[१८६६]=> भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन.
[१८८५]=> साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म.
[१९०९]=> मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म.
[१९११]=> पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म.
[१९१७]=> कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.
[१९४८]=> एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
[१९५०]=> भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.
[१९५५]=> पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.
[१९६०]=> भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.
[१९६३]=> नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.
[१९६३]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.
[१९६४]=> मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
[१९६५]=> भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.
[१९७३]=> इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन.
[१९७३]=> पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
[१९७६]=> अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
[१९८०]=> भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.
[१९८०]=> मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.
[१९८१]=> AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
[१९८५]=> स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन.
[१९८८]=> जागतिक एड्स दिन.
[१९८८]=> प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.
[१९९०]=> राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन.
[१९९२]=> कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.
[१९९२]=> ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
[१९९३]=> प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.
[१९९९]=> भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.
[२०००]=> नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.
[२०१५]=> ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.
हे पण पहा :- क्रियाविशेषण अव्यय
तुम्हाला १ डिसेंबर दिनविशेष | 1 December Dinvishesh | 1 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box