१ जानेवारी दिनविशेष | 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 31, 2023

१ जानेवारी दिनविशेष | 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi

१ जानेवारी दिनविशेष

1 January Dinvishesh

1 January day special in Marathi

१ जानेवारी दिनविशेष | 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi
            १ जानेवारी दिनविशेष ( 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ जानेवारी दिनविशेष ( 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ जानेवारी दिनविशेष

1 January Dinvishesh

1 January day special in Marathi


[१५१५]=> फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन.

[१६६२]
=> पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.

[१७४८]
=> स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.

[१७५६]
=> निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

[१८०८]
=> अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

[१८१८]
=> भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.

[१८४२]
=> बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

[१८४८]
=> महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

[१८६२]
=> इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

[१८७९]
=> ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म.

[१८८०]
=> विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

[१८८३]
=> पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

[१८९२]
=> स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म.

[१८९४]
=> भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म.

[१८९४]
=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन.

[१८९९]
=> क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

[१९००]
=> आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म.

[१९००]
=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

[१९०२]
=> भारतीय भूवैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म.

[१९०२]
=> भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म.

[१९०८]
=> संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

[१९१८]
=> ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म.

[१९१९]
=> गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

[१९२३]
=> अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म.

[१९२३]
=> चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

[१९२८]
=> लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म.

[१९३२]
=> डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.

[१९३६]
=> साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म.

[१९४१]
=> चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.

[१९४३]
=> शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

[१९४४]
=> दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन.

[१९५०]
=> भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.

[१९५१]
=> अभिनेते, दिग्दर्शक नाना पाटेकर यांचा जन्म.

[१९५५]
=> भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

[१९७५]
=> उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन.

[१९८९]
=> समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.

[१९९५]
=> WTO ची स्थापना झाली.

[२००९]
=> संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन.


हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १ जानेवारी दिनविशेष | 1 January Dinvishesh | 1 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad