११ डिसेंबर दिनविशेष
11 December Dinvishesh
11 December day special in Marathi
११ डिसेंबर दिनविशेष ( 11 December Dinvishesh | 11 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ डिसेंबर दिनविशेष ( 11 December Dinvishesh | 11 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ डिसेंबर दिनविशेष
11 December Dinvishesh
11 December day special in Marathi
[१७८३]=> रघुनाथराव पेशवा यांचे निधन.
[१८१६]=> इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
[१८४३]=> क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म.
[१८६७]=> आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म.
[१८८२]=> तामिळ साहित्यिक सुब्रम्हण्यम भारती यांचा जन्म.
[१८९२]=> पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.
[१८९९]=> कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.
[१९०९]=> साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.
[१९१५]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म.
[१९२२]=> अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.
[१९२५]=> मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म.
[१९२९]=> लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म.
[१९३०]=> सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
[१९३१]=> आचार्य रजनीश यांचा जन्म.
[१९३५]=> भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.
[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
[१९४२]=> प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म.
[१९४६]=> युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
[१९६७]=> कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
[१९६९]=> भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.
[१९७१]=> मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन.
[१९७२]=> अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
[१९८७]=> लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन.
[१९९२]=> भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.
[१९९४]=> अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
[१९९८]=> राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन.
[२००१]=> चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.
[२००१]=> झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन.
[२००१]=> भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन.
[२००२]=> कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन.
[२००४]=> भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.
[२००६]=> अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
[२०१३]=> भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.
हे पण पहा :- नाम
तुम्हाला ११ डिसेंबर दिनविशेष | 11 December Dinvishesh | 11 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box