१२ डिसेंबर दिनविशेष
12 December Dinvishesh
12 December day special in Marathi
१२ डिसेंबर दिनविशेष ( 12 December Dinvishesh | 12 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १२ डिसेंबर दिनविशेष ( 12 December Dinvishesh | 12 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१२ डिसेंबर दिनविशेष
12 December Dinvishesh
12 December day special in Marathi
[१८७२]=> राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूल चे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म.
[१८८१]=> वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म.
[१८८२]=> आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
[१८९२]=> गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म.
[१९०१]=> जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
[१९०५]=> लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म.
[१९०७]=> संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म.
[१९११]=> दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
[१९१५]=> हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म.
[१९२५]=> भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म.
[१९२७]=> इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म.
[१९३०]=> परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन.
[१९४०]=> राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म.
[१९५०]=> प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म.
[१९५२]=> भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
[१९६४]=> हिन्दी राष्ट्रकवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन.
[१९७१]=> संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
[१९८१]=> भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंग यांचा जन्म.
[१९९१]=> शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन.
[१९९२]=> साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.
[२०००]=> कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचे निधन.
[२००१]=> पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
[२००५]=> हिंदी चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे निधन.
[२००६]=> सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन.
[२०१२]=> उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन.
[२०१२]=> सतार वादक, भारतरत्न पण्डित रवी शंकर यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन.
[२०१६]=> प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
तुम्हाला १२ डिसेंबर दिनविशेष | 12 December Dinvishesh | 12 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box