१६ डिसेंबर दिनविशेष | 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 16, 2023

१६ डिसेंबर दिनविशेष | 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi

१६ डिसेंबर दिनविशेष

16 December Dinvishesh

16 December day special in Marathi

१६ डिसेंबर दिनविशेष | 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi

            १६ डिसेंबर दिनविशेष ( 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ डिसेंबर दिनविशेष ( 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ डिसेंबर दिनविशेष

16 December Dinvishesh

16 December day special in Marathi


[१४९७]=> वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

[१७७०]=> कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म.

[१७७३]=> अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.

[१७७५]=> इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म.

[१८५४]=> भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

[१८८२]=> इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म.

[१९०३]=> मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

[१९१७]=> विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म.

[१९२८]=> मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

[१९३२]=> प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला.

[१९४६]=> थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९६०]=> मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन.

[१९६५]=> इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन.

[१९७१]=> पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

[१९८०]=> केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन.

[१९८५]=> कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.

[१९९१]=> पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

[२००२]=> सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.

[२००४]=> नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन.

[२००६]=> अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.


हे पण पहा :- तद्भव शब्द

            तुम्हाला १६ डिसेंबर दिनविशेष | 16 December Dinvishesh | 16 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad