२ डिसेंबर दिनविशेष | 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 2, 2023

२ डिसेंबर दिनविशेष | 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi

२ डिसेंबर दिनविशेष

2 December Dinvishesh

2 December day special in Marathi

२ डिसेंबर दिनविशेष | 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi

            २ डिसेंबर दिनविशेष ( 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ डिसेंबर दिनविशेष | 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ डिसेंबर दिनविशेष

2 December Dinvishesh

2 December day special in Marathi


@ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस [ National Pollution Control Day ]

[१४०२]=> लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.

[१५९४]=> नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन.

[१८५५]=> कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म.

[१८८५]=> यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.

[१८९८]=> पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म.

[१९०५]=> सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.

[१९०६]=> कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.

[१९३७]=> महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.

[१९४२]=> एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.

[१९४२]=> मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.

[१९४२]=> योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.

[१९४४]=> कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म.

[१९४७]=> भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.

[१९५९]=> अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.

[१९७१]=> अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.

[१९७२]=> भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.

[१९७६]=> फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

[१९८०]=> पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन.

[१९८४]=> राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस.

[१९८८]=> बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.

[१९८९]=> भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.

[१९९६]=> आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्‍ना रेड्डी यांचे निधन.

[१९९९]=> काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर

[२००१]=> एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

[२०१४]=> महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन.


हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय

            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 2 December Dinvishesh | 2 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad