२० डिसेंबर दिनविशेष | 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 20, 2023

२० डिसेंबर दिनविशेष | 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi

२० डिसेंबर दिनविशेष

20 December Dinvishesh

20 December day special in Marathi

२० डिसेंबर दिनविशेष | 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi

            २० डिसेंबर दिनविशेष ( 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० डिसेंबर दिनविशेष ( 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० डिसेंबर दिनविशेष

20 December Dinvishesh

20 December day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस [ International Day of Human Solidarity ]

[१७३१]=> बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन.

[१८६८]=> फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म.

[१८९०]=> नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचा जन्म.

[१९०१]=> अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म.

[१९०९]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म.

[१९१५]=> भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन.

[१९२४]=> अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.

[१९३३]=> संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन.

[१९४०]=> पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.

[१९४२]=> पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास यांचा जन्म.

[१९४५]=> भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म.

[१९४५]=> मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.

[१९५६]=> देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन.

[१९७१]=> झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

[१९७१]=> द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन.

[१९९३]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.

[१९९४]=> राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.

[१९९६]=> अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक कार्ल सगन यांचे निधन.

[१९९६]=> बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन.

[१९९८]=> जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचे निधन.

[१९९९]=> पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.

[२००१]=> सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन.

[२०१०]=> अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन.

[२०१०]=> भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

[२०१०]=> लेखक सुभाष भेंडे यांचे निधन.


हे पण पहा :- साधित शब्द

            तुम्हाला २० डिसेंबर दिनविशेष | 20 December Dinvishesh | 20 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad