२३ डिसेंबर दिनविशेष
23 December Dinvishesh
23 December day special in Marathi
२३ डिसेंबर दिनविशेष ( 23 December Dinvishesh | 23 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २३ डिसेंबर दिनविशेष ( 23 December Dinvishesh | 23 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२३ डिसेंबर दिनविशेष
23 December Dinvishesh
23 December day special in Marathi
@ राष्ट्रीय शेतकरी दिन [ National Farmers Day ]
२३ डिसेंबर हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान श्री.चरणसिंग चौधरी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी किसान दिवस / शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
[१६९०]=> मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
[१८३४]=> प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन.
[१८५४]=> ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचा जन्म.
[१८९३]=> हॅन्सेल अॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
[१८९७]=> ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.
[१९०२]=> भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म.
[१९१४]=> पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.
[१९२६]=> स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या.
[१९४०]=> वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
[१९४७]=> अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
[१९५४]=> डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
[१९५४]=> बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९६५]=> नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन.
[१९७०]=> धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
[१९७९]=> हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.
[१९९८]=> स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पा कुंभार यांचे निधन.
[२०००]=> कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
[२०००]=> मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन.
[२००१]=> बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
[२००४]=> भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन.
[२००८]=> गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन.
[२०१०]=> कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन.
[२०१०]=> केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन.
[२०१३]=> एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन.
[२०१३]=> सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
हे पण पहा :- अभ्यस्त शब्द
तुम्हाला २३ डिसेंबर दिनविशेष | 23 December Dinvishesh | 23 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box