२४ डिसेंबर दिनविशेष | 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 24, 2023

२४ डिसेंबर दिनविशेष | 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi

२४ डिसेंबर दिनविशेष

24 December Dinvishesh

24 December day special in Marathi

२४ डिसेंबर दिनविशेष | 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi

            २४ डिसेंबर दिनविशेष ( 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ डिसेंबर दिनविशेष ( 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ डिसेंबर दिनविशेष

24 December Dinvishesh

24 December day special in Marathi


@ भारतीय ग्राहक दिन [ Indian Consumer Day ]

[११६६]=> इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म.

[१५२४]=> पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.

[१७७७]=> कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

[१८१८]=> ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म.

[१८६४]=> ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म.

[१८८०]=> स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म.

[१८९९]=> नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म.

[१९०६]=> रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

[१९१०]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

[१९१०]=> हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म.

[१९२४]=> अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

[१९२४]=> पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म.

[१९३२]=> भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे यांचा जन्म.

[१९४२]=> भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म.

[१९४३]=> दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

[१९५१]=> लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.

[१९५७]=> अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा जन्म.

[१९५९]=> हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.

[१९६७]=> बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन.

[१९७७]=> आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन.

[१९७९]=> सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

[१९८६]=> भारतीय ग्राहक दिन.

[१९८७]=> अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन.

[१९८८]=> भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन.

[१९९३]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन.

[१९९९]=> काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

[१९९९]=> नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन.

[२०००]=> कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन.

[२००५]=> तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन.

[२०१६]=> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.


हे पण पहा :- सामासिक शब्द

            तुम्हाला २४ डिसेंबर दिनविशेष | 24 December Dinvishesh | 24 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad