२६ डिसेंबर दिनविशेष
26 December Dinvishesh
26 December day special in Marathi
२६ डिसेंबर दिनविशेष ( 26 December Dinvishesh | 26 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २६ डिसेंबर दिनविशेष ( 26 December Dinvishesh | 26 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२६ डिसेंबर दिनविशेष
26 December Dinvishesh
26 December day special in Marathi
[१५३०]=> पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन.
[१७८५]=> बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म.
[१७९१]=> इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म.
[१८९३]=> आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म.
[१८९५]=> लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
[१८९८]=> मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
[१९१४]=> कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म.
[१९१४]=> स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म.
[१९१७]=> साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.
[१९२५]=> शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म.
[१९३५]=> रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म.
[१९४१]=> रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.
[१९४८]=> डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.
[१९७२]=> अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन.
[१९७५]=> मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.
[१९७६]=> कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
[१९८२]=> टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
[१९८९]=> व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन.
[१९९१]=> सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
[१९९७]=> विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.
[१९९९]=> भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन.
[२०००]=> नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.
[२००४]=> ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.
[२००६]=> अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन.
[२०११]=> कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन.
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
तुम्हाला २६ डिसेंबर दिनविशेष | 26 December Dinvishesh | 26 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box