२८ डिसेंबर दिनविशेष | 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 28, 2023

२८ डिसेंबर दिनविशेष | 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi

२८ डिसेंबर दिनविशेष

28 December Dinvishesh

28 December day special in Marathi

२८ डिसेंबर दिनविशेष | 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi

            २८ डिसेंबर दिनविशेष ( 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ डिसेंबर दिनविशेष ( 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ डिसेंबर दिनविशेष

28 December Dinvishesh

28 December day special in Marathi


[१६१२]=> गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

[१६६३]=> इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन.

[१८३६]=> स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

[१८४६]=> आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

[१८५६]=> अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म.

[१८८५]=> भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.

[१८९९]=> मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म.

[१९०३]=> हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.

[१९०८]=> मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.

[१९११]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म.

[१९२२]=> स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म.

[१९२६]=> हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म.

[१९३१]=> चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन.

[१९३२]=> प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन धीरूभाई अंबानी यांचा जन्म.

[१९३७]=> टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म.

[१९४०]=> भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.

[१९४१]=> भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.

[१९४५]=> नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म.

[१९४८]=> मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

[१९५२]=> केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म.

[१९६७]=> अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन.

[१९६९]=> लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.

[१९७१]=> पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.

[१९७७]=> हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन.

[१९८१]=> हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.

[१९९५]=> कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

[२०००]=> ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन.

[२०००]=> प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन.

[२००३]=> कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.

[२००३]=> संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन.



            तुम्हाला २८ डिसेंबर दिनविशेष | 28 December Dinvishesh | 28 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad