४ डिसेंबर दिनविशेष | 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 4, 2023

४ डिसेंबर दिनविशेष | 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi

४ डिसेंबर दिनविशेष

4 December Dinvishesh

4 December day special in Marathi

४ डिसेंबर दिनविशेष | 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi

             डिसेंबर दिनविशेष ( 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ४ डिसेंबर दिनविशेष | 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

४ डिसेंबर दिनविशेष

4 December Dinvishesh

4 December day special in Marathi


@ भारतीय नौसेना दिवस [Indian Navy Day]

[११३१]=> पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचे निधन.

[१७७१]=> द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.

[१८२९]=> भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.

[१८३५]=> इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म.

[१८५०]=> विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन.

[१८५२]=> रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.

[१८६१]=> आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म.

[१८८१]=> लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.

[१८९२]=> स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.

[१९०२]=> डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन.

[१९१०]=> आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म.

[१९१०]=> भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म.

[१९१६]=> पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म.

[१९१९]=> भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म.

[१९२४]=> गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

[१९३२]=> दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.

[१९३५]=> पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म.

[१९४३]=> मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.

[१९४८]=> भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

[१९६७]=> थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.

[१९७१]=> भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.

[१९७१]=> भारतीय नौसेना दिवस.

[१९७३]=> कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन.

[१९७५]=> जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.

[१९७५]=> सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९७७]=> भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.

[१९८१]=> मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.

[१९९१]=> पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

[१९९३]=> उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

[१९९७]=> संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

[२०००]=> सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन.

[२०१४]=> भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन.


हे पण पहा :- नाम

            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 4 December Dinvishesh | 4 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad